Dr. Heena Gavit Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदेंच्या 'या' शिलेदाराला आमदारकी फिक्स? मुंबई बोलावताच माजी खासदार हिना गावित आक्रमक

Former MP Heena Gavit MLC nomination ex-MLA Chandrakant Raghuwanshi Nandurbar Eknath Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे शिवसेनेकडून नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषद उमेदवारीला माजी खासदार हिना गावित यांचा विरोध केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या सोमवारी शेवटचा दिवस आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आहे.

नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेतल्याने त्यांना संधी निश्चित मानली जात आहे. पण, चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीला माजी खासदार हिना गावित यांनी तीव्र विरोध केला आहे. यातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेविरोधात हिना गावित यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून (Shivsena) चौघांचे नाव आघाडीवर आहेत. नंदूरबारचे माजी आमदार तथा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि नागपूरचे किरण पांडव यांची नावे शिवसेनेतून आघाडीवर आहेत.

चंद्रकांत रघुवंशी यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला (Mumbai) बोलावलं आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी 'फिक्स' असल्याची चर्चा आहे. शिंदेंचा निरोप येताच, चंद्रकांत रघुवंशी देखील मुंबईकडे रवाना झाले आहेत. विधान परिषदेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांचा दोनदा नाव चर्चेत होता. पण दोन्ही वेळा त्यांचा पत्ता कट झाला होता.

एकनाथ शिंदेंनी आता चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी मिळते, याकडे आता लक्ष आहे. आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेत राजीनामा देत विधानसभा निवडणुकीत विजय झाले. तेव्हापासून रिक्त जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती.

हिना गावित शिवसेनेविरुद्ध आक्रमक

मात्र माजी खासदार हिना गावित यांनी शिवसेनेविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेत, चंद्रकांत रघुवंशी यांचा विधान परिषदेच्या आमदारकीला तीव्र विरोध केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपविरोधात प्रचार केल्याचा आरोप हिना गावित यांनी केला होता. तेव्हापासून हिना गावित कायम शिवसेनाविरोधात आक्रमक आहेत. भाजप श्रेष्ठींकडे यावर ठाम भूमिका मांडणार असल्याचे हिना गावित यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT