Uddhav Thackeray, Uday Samant, Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Uday Samant News : शिंदेच्या दरे गावातील मुक्कामाची तुलना थेट ठाकरेंच्या लंडनवारीशी; सामंत विरोधकांवर बरसले

Uday Samant’s Sharp Criticism of Uddhav Thackeray : शिवसेना आणि सेनेचा धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना मिळाला. त्यामुळे उद्धव सेनेच्या नेत्यांना ते चांगलेत खटकत आहे, अशी टीका उदय सामंत यांनी केली.

Rajesh Charpe

Nagpur News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरेवारी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लंडनवारीची आता तुलना होऊ लागली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यावरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिंदे हे आपल्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाहीत, असे सामंत यांनी सुनावले आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले, शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेहमीच टार्गेटवर असतात. त्यांनी काहीही चांगले केले तरी ठाकरे सेनेच्या लोकांना ते पचत नाही. काश्मीरमध्ये अडकेलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी ते पहलगामला धावून गेले त्यावरही टीका केली, त्यानंतर शेती पाहण्यासाठी आपल्या दरे गावात गेले तेही यांना रुचले नाही. शिंदे हे आपल्याच गावाला गेले तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाही.

एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले होते. अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याच नेतृत्वात महायुतीने विधानसभेची निवडणूक लढली. पुन्हा महायुतीचे सरकार आले. शिवसेना आणि सेनेचा धनुष्यबाणही त्यांनाच मिळाला. त्यामुळे उद्धव सेनेच्या नेत्यांना ते चांगलेत खटकत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात, अशी टीकाही सामंत यांनी केले.

दरे गाव महाराष्ट्रातच आहे. एकनाथ शिंदे यांची तिथे शेती आहे. ते यावेळी पहिल्यांदाच गेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाही ते जात होते. ते काही पिकनिला लंडनला जात नाही, अशा शब्दांत सामंत यांनी उद्धव सेनेच्या नेत्यांवर बोचरी टीका केली. कोणी कुठे जायचे यावर आम्ही यावर कधी बोलत नाही. त्यांच्या घरातील सगळी मंडळी लंडनला गेली, तरीही आम्ही टीका करत नाही. हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे. शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमचे काही बिघडणार नाही. मात्र शिंदे यांच्यामुळे अनेकांचे अस्तित्व संपले, त्यामुळे ते सतत टीका करीत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक बळी पडले. शेकडो पर्यंटक अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी शिंदे तत्काळ पहलगामला गेले. पर्यटकांना धीर दिला. त्यांनी सोडवणूक केली. अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणले. यात काय वाईट आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांचे आभार मानत आहे. फक्त उद्धव सेनेच्याच नेत्यांना ते खटकत आहे, असेही सामंत म्हणाले.

भास्कर जाधव नाराज आहेत. उद्धव सेना सोडणार आहेत, अशा चर्चा सुरू आहे. यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ते गेले होते. यावर सामंत म्हणाले, दादा हे येणारच होते. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी उपस्थित होतो. आमच्या जिल्ह्यातील आमदार म्हणून भास्कर जाधव आले होते. यामागे काही राजकीय उद्देश नव्हता, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT