Eknath Shinde : बिळात लपलेल्या 107 पाकिस्तान्यांबाबत काय करायचं? पोलिसांना सरकारचं असलेलं फर्मान एकनाथ शिंदेंनी सांगितलं

Mahayuti Government Orders Police Action Against Illegal Pakistani Residents Eknath Shinde in Buldhana : महाराष्ट्रात बेकायदेशीर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत पोलिसांनी काय कारवाई करायची हे महायुती सरकारचा आदेश दिले आहेत, अशी माहिती बुलढाणा इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Eknath Shinde 1
Eknath Shinde 1Sarkarnama
Published on
Updated on

Police action on illegal Pakistanis : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात बेकायदेशीर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात केंद्रातील मोदी सरकार आक्रमक झालं आहे. महाराष्ट्रातील देखील महायुती सरकार अ‍ॅक्शन मोडवर आहे. व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत देशात पाठवण्याची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पण बेकायदेशीरपणे राहणाऱ्या, राज्यात लपून बसलेले 107 पाकिस्तान्यांबाबत महायुती सरकारने पोलिसांना कारवाईचे फर्मान आहे. त्यांनी वेळीच देश सोडला नाही, तर पोलिस त्यांना शोधन तिथेच ठोकतील, असे हे फर्मान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिवसेना (Shivsena) नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा इथं दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पहलगाम दहशतीवादी हल्लाच्या पार्श्वभूमीवर देशातून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या कार्यवाहीवर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात लपून बसलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा आकडा देखील बोलून गेले.

Eknath Shinde 1
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना लवकरच खुशखबर मिळणार; मुख्यमंत्र्यांचा हवाला देत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

एकनाथ शिंदे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तान नागरिकांनी तत्काळ देश सोडवा. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नोंदी झाल्या आहेत, त्यांनी देखील देश सोडवा, असे महायुती सरकारने फर्मान काढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी देखील हा इशारा दिला आहे".

Eknath Shinde 1
26/11 Mumbai attack story : मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित चित्रपट अन् वेब सिरिज...

राज्यात बेकायदेशीर पद्धतीने बिळात लपून बसलेल्या 107 पाकिस्तान्यांना पोलिस त्यांना शोधतील आणि तिथेच ठोकतील. पाकिस्तानला दयामया दाखवण्याची गरज नाही. जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

आमदार गायकवाडांना घातलं पाठिशी

आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांसंदर्भात केलेल्या वक्तव्य संदर्भात, दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यांच्या काही पोलिसांच्या बाबतीत तक्रारी असतील, तर त्या मुख्यमंत्री किंवा माझ्याकडे सांगाव्यात, निश्चित कारवाई होईल. परंतु काही पोलिसांमुळे अख्या पोलिस दलाला दोषी पकडता येणार नाही, आम्ही वर्दीचा सन्मान करणारी लोक आहोत, असे सांगून आमदार गायकवाड यांच्या विधानाला एकनाथ शिंदे यांनी पाठिशी घातले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com