Ram Shinde felicitation : राम शिंदेंच्या सभापतीपदाला कुणा कुणाचा होता विरोध? बावनकुळे म्हणतात, माझ्याकडे यादीच...

Amaravati Dhangar Community Felicitates Ram Shinde Chandrashekhar Bawankule Reacts : प्रा. राम शिंदे यांच्या विधान परिषद सभापतीपदाला विरोध करणाऱ्यांवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
Ram Shinde felicitation
Ram Shinde felicitationSarkarnama
Published on
Updated on

Amaravati news : अमरावती इथं धनगर समाजाच्यावतीने विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रा. राम शिंदे यांच्या विरोधकांना मोठी आठवण करून दिली.

मंत्री बावनकुळेंची ही सूचक विधान नेमकं कोणा कोणाला लागू पडतात, यावर आता पक्षांतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रा. राम शिंदे यांच्या सभापतीपदी निवडीला विरोध करणाऱ्यांची यादीच माझ्याकडे आहेत, असे सांगताना, ती नावं भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचा अमरावती इथं धनगर समाजाच्यातर्फे सत्कार झाला. या सत्कार कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बावनकुळे यांनी प्रा. शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचे वर्णन करताना, 'हार कर जीतने वालों को बाजीगर कहतें है, तसंच हार कर जीतने वालों को राम शिंदे कहते है', असं म्हणत कौतुक केलं.

Ram Shinde felicitation
Anil Bonde On Rahul Gandhi : 'राहुल गांधींना 'सर्वोच्च' चटका, मला जो अपेक्षित होता'; खासदार बोंडेंनी जुना हिशोब काढला

अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामकरण केलं. याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी प्रमुख मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Narendra Modi) केल्याची देखील आठवण करून देताना, प्रा. राम शिंदे यांना जाणीवपूर्वक मतदार संघात पाडण्याकरता षडयंत्र रचलं गेलं. या निवडणुकीत राम शिंदे मशीनवर जिंकले, पण पोस्टल बॅलेटवर हारले. पुढच्या निवडणुकीमध्ये राम शिंदे सर्वांची डिपॉझिट जप्त करून सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Ram Shinde felicitation
Krishnaswamy Kasturirangan : इस्त्रो माजी प्रमुख, पद्मश्री, पद्मभूषण अन् पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित कृष्णस्वामी कस्तुरीरंगन...

प्रा. राम शिंदे यांना विधान परिषदेचे सभापतीपद देऊ नये, यासाठी कोणी कोणी विरोध केला, याची यादीच माझ्याकडे आहे, ही नावे माझ्यापुरती मर्यादीत नाहीत. विरोध करणारे नाव माझ्याकडे येतात, मग मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, यावरून तुम्ही ओळखून घ्या. देवेंद्र फडणवीस हे राम शिंदे यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करतात, हेच विरोधक विसरल्याचा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

प्रा. शिंदे स्मार्ट तरी डाग नाही

प्रा. राम शिंदे सगळ्यासोबत प्रेमाच नातं ठेवतात. कधीच त्यांच्या डोक्यात हवा गेली नाही. प्रा. राम शिंदे यांच्यावर कोणताही डाग नाही. पैशाचा डाग नाही, बाईचा डाग नाही, एवढे स्मार्ट असून देखील राजकारणात ते महत्वाचे आहे. निष्कलंक असलेला माणूस, सर्वांची प्रश्न समजून घेणारा माणूस, म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे. बोलण्यापेक्षा ऐकणावर लक्ष देणारा हा माणूस आहे, असे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले.

चौंडी मंत्रिमंडळाची बैठक होणारच...

माझा पराभव झाल्यानंतर मी कधीही नैराश्यामध्ये गेलो नाही. मी जिद्द बाळगून नव्याने लढण्याची तयारी ठेवतो. चौंडी (ता. जामखेड) इथं मंत्रिमंडळाची होणार बैठक 29 एप्रिलला होणार होती. ती बैठक रद्द होणार, असे म्हटले जात आहे. पण तसे काही होणार नाही. ती बैठक पुढे सहा मे रोजी ढकलली गेली आहे आणि त्याच वेळेत ती होणार. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कोणतीही बैठक रद्द होणार नाही, असे सांगून बैठक होणार आणि 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com