Nana Patole
Nana Patole sarkarnama
विदर्भ

भाजप नेत्याची बंडखोरी! नाना पटोलेंसोबत जाऊन पक्षालाच गाठणार खिंडीत

Abhijeet Ghormare

भंडारा : भाजपचे (Bjp) माजी आमदार चरण वाघमारे आपल्या निर्णयाला अजुन ही ठाम असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबाब झुगारून झुकेगा नही साला म्हणत काँग्रेसला (Congress) दिलेला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चरण वाघमारे यांच्या गटातील 6 उमेदवार मंगळवारी काँग्रेसला मतदान करणार असल्याचे बोलले जात आहे. (Nana Patole Latest News)

विशेष, म्हणजे माजी आमदार चरण वाघमारे आपले राजकीय वैरी विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारमोरे यांच्या सोबत सत्तेत बसण्यास इच्छुक नसल्याचे खास सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसचा सध्या असलेला तणाव काही अंशी मित्रांकडून दूर झाला असला तरी काँग्रेसमधीलही अंतर्गत गटबाजी अजून क्षमलेली नाही. काँग्रेसला हा मुद्दातरी दुर्लक्षित करने परवडणारे नाही.

आपल्या परंपरागत विरोधक असलेल्या काँग्रेसशी भाजपचा एक गट हात मिळवनी करुन बसला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आमदार चरण वाघमारे आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार राजू कारमोरे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळेच आपल्या परंपरागत मित्र असलेल्या काँग्रेसला डावलून भाजप सोबत असलेल्या राष्ट्रवादीला वाघमारे यांचा विरोध आहे. भाजप-राष्ट्रावादी जिल्हा परिषदेसाठी एकत्र आली तरी आपला गट यात सामिल होणार नाही, असे वाघमारे ओरडून सांगात आहेत. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये 52 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपला 12, राष्ट्रावादी काँग्रेसला 13, काँग्रेसला 21, अपक्ष 3, शिवसेना 1, वंचित 1, बिसपी 1 असे पक्षीत बलावल आहे. काँग्रेस 21 जागा जिंकत मोठा पक्ष बनला आहे. विशेष म्हणजे मैजिक फिगर पासून काँग्रेस दूर आहे. काँग्रेसला आपला परंपरागत मित्र राष्ट्रवादी मदत करणार अशी अपेक्षा होती. मात्र, बोदरकसा येथे झालेल्या बैठकीनंत्तर काँग्रेस अस्वस्थ आहे.

येन पंचायत समितिच्या सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडुन भाजप सोबत सत्तेत बसली. भाजपच्या नाराज असलेल्या वाघमारे गटाने समर्थन दिल्याने काँग्रेस जिल्ह्यात तरली आहे. वाघमारे राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसन्यास इच्छुक नसल्याने ते काँग्रेस सोबत गेले आहेत. जिल्हा परिषदेत वाघमारे यांचा भाजपचा गट व काँग्रेस गट सत्ता स्थापनेची दावेदारी करणार हे मात्र निच्छित झाले आहे. दूसरीकडे डॉ. परिणय फुके व मेंढे यांचा गट राष्ट्रावादी काँग्रेसशी हात मिळवनी करून बसला आहे. त्यामुळे भाजपचे 12 सदस्य निवडून आले असले तरी यात चरण वाघमारे यांचे 5 सदस्य नसल्यास फुके व मेंढे याच्या गटाकडे केवळ 7 जागा राहतील. राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी फुके व मेंढे यांच्या गटाला वाघमारे गटाला घेणे गरजेचे आहे. तेव्हाच भाजपचे 12 व एक भाजप समर्पित अपक्ष व राष्ट्रावादी चे 13 असे (12+1+13+1 = 27) अशी मैजिक फिगर गाठता येईल. वाघमारे गट राष्ट्रवादी सोबत जाण्यास इच्छुक नाही. त्यामुळे बाघमारे गटाचे 5 व एक अपक्ष असे सहा सदस्य घेऊन ते काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक आहेत.

तसेच वाघमारे गटाला पुन्हा भाजपच्या प्रवाहात आण्याची जबाबदारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुले (Chandrasekhar banavakule) यांना देण्यात आली आहे. असे असले तरी वाघमारे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे 21 सदस्य आहेत. यात काँग्रेसचे 21 व वाघमारे यांच्या गटाचे 6 एक वंचितचे सदस्य आणि 2 अपक्ष असे 29 (21+6+1+2=29) या गणितानुसार काँग्रेसचीही सत्ता स्थापन होऊ शकते. मात्र, काँग्रेसमध्येही अध्यक्षपदाच्या नावावर विरोध सुरु झाला आहे. काँग्रेसचेही आठ मत फुटतील असे जवळपास निच्छित मानले जात आहे. त्यामुळे काँग्रेस 29 च्या फीगरमध्ये 8 मते फूटली तरी अल्पमतात येऊ शकते. या राजकारणात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

काँग्रेसचे 8 सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कत असल्याने सूत्राकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे यांच्या मदतीने भाजप व राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार असल्याचे वक्तव्य राजकीय धुरीनांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे उद्या होणारी जिल्हा परिषद निवडणूक राजकीय धुराळयाची ठरणार है मात्र निच्छित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT