फडणवीसांची चतुर खेळी; प्रफुल्ल पटेलांना देणार धोबीपछाड

गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदेत मंगळवारी (10 मे) ला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक
devendra Fadnavis
devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदेत मंगळवारी (10 मे) ला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 53 जागापैकी भाजपने 26 जागा जिंकल्या आहेत. मात्र, मॅजिक फिगर गाठण्यासाठी एका सदस्याची भाजपला (Bjp) गरज असतांना रविवारी अपक्ष उमेदवार पोर्णीमा ढेंगे, सोनू कुथे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. (Devendra Fadnavis Latest News)

या भेटीत पोर्णिमा ढेंगे व सोनू कुथे यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. खासदार सुनील मेंढे याच्या प्रयत्नातून ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. काल झालेल्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी गोंदिया पंचायत समिती निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), चाबी संघटन आणि दोन अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन होणार, असे समीकरण निर्माण झाले होते. हा धोका जिल्हा परिषदेतही निर्णाण होण्याची शक्यता होती. गोंदिया पंचायत समितीत भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या, तरी तेथे सत्ता गमवावी लागली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने वेळीच खेळ करत आघाडीला रोखण्याची मोहीम आखली आहे. त्यातूनच या दोन अपक्षा सदस्यांना जवळ करण्यात आले आहे.

devendra Fadnavis
Beed : नवनीत राणांचे आव्हान शिवसेनेच्या मंत्र्याने स्वीकारले ; मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर अमरावतीतून लढणार..

दरम्यान, विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या निवासस्थानी दोन्ही अपक्षांनी त्यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या दोन्ही अपक्षांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता स्थापन होणार, असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

devendra Fadnavis
विलासराव आज असते तर, या भाजप आमदाराच्या प्रश्नावर धीरज देशमुख म्हणाले...

तरी सुद्धा उद्याच्या मतदान प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अपक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे पारडे जड झाले आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रयत्नावर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे. यामुळे फडणवीसांनी योग्य खेळी करत भाजपच्या सत्तेचा मार्ग सुखर केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP leader Arun Lakhani after being elected unopposed from the Chandrapur-Wardha-Gadchiroli Local Authorities Constituency, with discussions focusing on Banti Bhangdia’s political strategy.
BJP
Model Code of Conduct
Viplav Bajoria
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com