Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Fadanvis's Devgiri News : फडणवीसांच्या देवगिरीवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, आयुक्तांचा खुलासा !

Nagpur Devgiri : देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर प्रवेशाच्या कारणावरून हा वाद झाला होता.

Atul Mehere

Nagpur Political News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपराजधानी नागपुरातील देवगिरी शासकीय निवासस्थानाबाहेर पोलिस अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे वृत्त निराधार असून, असा कोणताही प्रकार घडला नाही, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. (The dispute was over the reason of entry outside the Devagiri residence)

देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी निवासस्थानावर प्रवेशाच्या कारणावरून भाजपचे युवा शहर प्रमुख पुष्कर पोशेट्टीवार आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्यात मोठा वाद झाल्याचे वृत्त काल (ता. १७) वाऱ्यासारखे पसरले होते. देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर प्रवेशाच्या कारणावरून हा वाद झाला होता.

या प्रकरणात पुष्कर यांनी माफी मागितली असल्यामुळे या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा अदखलपात्र म्हणूनही त्याची नोंद घेण्यात आलेली नाही, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज (ता. १८) स्पष्ट केले.

काही माध्यमांकडून वाढून चढवून हे प्रकरण दाखविले जात आहे. असं काहीही घडलं नाही. प्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांसोबत थोडा वाद झाला. असे बरेचदा होतच असते. मात्र, पोलिस उपायुक्तांनी मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांनी माफी मागितली व तो वाद तेथेच संपला. गुन्हा दाखल होईल असं कुठलंही प्रकरण झाले नाही. वर्दीवर हात उचलला वगैरे जे काही सांगण्यात येत आहे, ते अतिशय चुकीचं आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिदेखील असल्याने त्यांना अत्यंत चोख पोलिस सुरक्षा आहे. त्यामुळे पोलिसांना नियमाप्रमाणेच काम करावे लागते. आपापल्या नेत्याला भेटायची प्रत्येक कार्यकर्त्याला इच्छा असते, परंतु सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनाही काही मर्यादांचे पालन करावे लागते.

अशा प्रसंगांमध्ये बरेचदा कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद होतच राहतात. ही काही नवीन बाब नाही, असे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. मात्र, काही प्रसार माध्यमांनी या प्रकरणाचा विपर्यास करीत वृत्त प्रसारित केल्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांबद्दल गैरसमज पसरला. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला.

नागपुरात प्रत्येक अनेक महत्त्वाच्या व अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे सुरू असतात. त्यापैकी अनेकांना झेड व झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे पोलिसांना आपले कर्तव्य बजावताना बरेचदा नाराजीला तोंड द्यावे लागते. पोलिसांच्या सुरक्षेमुळे कार्यकर्ते बरेचदा नाराज होऊन परत जातात. परंतु हा आपापल्या कर्तव्याचा भाग आहे. कार्यकर्त्यांना नेत्यांना जवळून भेटावे वाटणारच आणि पोलिस आपली ड्यूटी करणारच.

वरिष्ठ पोलिस अधिकारी वादाचे प्रसंग टाळण्यासाठी सुवर्णमध्य मार्ग काढत असतात. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनीदेखील देवगिरीवर असा सुवर्णमध्य मार्ग काढत संभाव्य वाद टाळला, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. देवगिरीवर पोलिस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सामंजस्यांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्याचा किंवा कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, असे अमितेश कुमार  यांनी  सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT