Amaravati Agriculture Bogus Recruitment Advertisement Amaravati Agriculture Bogus Recruitment Advertisement
विदर्भ

Fake Govt Advt: कृषी विभागातील नोकरभरतीची 'ती' जाहिरात बनावट! सहसंचालक डॉ. गणेश घोरपडेंचा सावधगिरीचा इशारा

Fake Govt Advt: वर्ग-३ भरतीचे पत्र खोटे असल्याचा कृषी विभागाचा खुलासा, पैशांच्या व्यवहारापासून दूर राहण्याचे उमेदवारांना आवाहन

Amit Ujagare

Fake Govt Advt: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या नावाखाली सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लार्क वर्ग-३ (गट-क) पदांच्या भरतीची जाहिरात पूर्णपणे खोटी आणि बोगस असल्याचे स्पष्ट झालं आहे. या व्हायरल जाहिरातीवर कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं उघडकीस आलं असून, याप्रकरणी अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. गणेश घोरपडे यांनी संबंधित जाहिरात बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या बनावट जाहिरातीमुळं बेरोजगार युवकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं कोणीही त्याला बळी पडू नये आणि कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू नये, असं आवाहन अमरावती कृषी विभागाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

कृषी सहसंचालक डॉ. गणेश घोरपडे म्हणाले, अमरावती विभागातील गट-क संवर्गातील क्लार्क या पदांची भरती करण्यात येणार असल्याबाबतच एक बोगस निवेदन समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालं आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्या उमेदवारांना भरतीत भाग घ्यायचा आहे त्यांनी अमरावतीत त्यांचे अर्ज सादर करावेत. पण मी इथं हे स्पष्ट करु इच्छितो की, हे निवदेन बोगस असून हा कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे.

त्यामुळं मी संभाव्य सर्व उमेदवारांना आणि संबंधितांना सर्वांना मी याठिकाणी आवाहन करतो की, अशा निवेदनाला किंवा त्या दावा करण्यात आला आहे त्याला बळी पडू नये, त्यासाठी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन किंव ऑफलाईन कुठलीही रक्कम मग ती परीक्षा शुल्काची असो किंवा कुठल्याही कारणासाठी मागितलेली असोत ती भरु नये. कृषी विभागातील ज्या शासकीय भरत्या अधिकृतपणे केल्या जातात, त्याची अधिकृत जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली जाते. तसंच शासनानं ज्या सुचना दिल्या आहेत त्याप्रमाणं कार्यवाही पूर्ण करुनच या भरती प्रक्रिया राबवल्या जातात. त्यामुळं अशा बोगस भरती प्रक्रियेपासून उमेदवारांनी सावध राहावं असं मला सर्वांना आवाहन करायचं आहे, असं कृषी सहसंचालक डॉ. गणेश घोरपडे यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT