Leader Of Opposition Ambadas Danve With Farmers At Buldhana. Sarkarnama
विदर्भ

Buldhana Ambadas Danve : कृषी अधिकारी, विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांचा संताप

Unseasonal Rain : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या बुलडाणा भेटीत अनेकांनी वाचला तक्रारींचा पाढा

गजानन काळुसे

Farmer's Got Angry : अवकाळी पाऊस व गारपिटीनं विदर्भातील अनेक जिल्ह्यांना तडाखा दिला आहे. शेतांमधील पिकांचं त्यामुळं पूर्णपणे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपन्या मदत करीत नसल्यानं बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या समक्ष तीव्र संताप व्यक्त केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते दानवे यांनी बुधवारी (ता. 29) बुलडाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांमध्ये जात शेतांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. (Farmer's From Buldhana Got Angry On Agriculture Officers & Insurance Companies In Front Of Shiv Sena Leader & Leader Of Opposition Ambadas Danve)

सलग दोन दिवस बुलडाणा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पावसामुळे हरभरा, कापूस, गहू, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा या भागांमध्ये गारपीटही झाली. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या गावांना दानवे यांनी भेट दिली. गावांमधील चावडीवर येत त्यांनी जाहीरपणे सर्वांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. या वेळी शेतकऱ्यांसह गावातील महिलांनीही कृषी विभाग व विमा कंपन्यांबद्दल चांगलाच रोष व्यक्त केला. कृषी अधिकारी शेतकऱ्यांची कशा प्रकारे अडवणूक करीत आहेत, या तक्रारींचा पाढाच एकापाठोपाठ अनेक शेतकऱ्यांनी दानवे यांच्या समक्ष वाचला.

गावांना भेट दिल्यानंतर ‘सरकारनामा’शी बोलताना दानवे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेडनेटला विमा संरक्षण नाही. त्यामुळं त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे. नागपूर येथे डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेश होत आहे. या अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. पाऊसही जोरात होता. गारा आणि पाऊस यामुळं शेतांमधील शेडनेट कोसळल्या. परिणामी पिकांना मोठा फटका बसला. अनेक शेडनेटचे प्लॉट जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळं झालेलं नुकसान कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. विमा आणि बियाणे कंपन्यांनीही हात वर केले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी गडद झाल्या आहेत. याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणे गरजेचं झालं आहे, असं दानवे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पैशांवर बियाणे कंपन्या मालामाल होतात, परंतु नुकसानीच्या काळात त्यांना मदत करत नाहीत. यासंदर्भात तर सरकारला जाब विचारावाच लागेल, असं त्यांनी सांगितलं. याबाबत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार नसेल, तर विरोधी पक्ष या नात्यानं आम्हाला काही तरी करावं लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT