Navneet Rana News: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नवीन जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे.या नव्या जिल्हा प्रभारींच्या यादीत मराठवाड्यात विशेष फेरबदल करण्यात आले आहेत. यात भाजपनं नव्या-जुन्यांची सांगड घालत संघटनेत काम करण्याची संधी अनेकांना दिली आहे. मात्र,यात हिंदुत्वाचा मुद्दा भाजपकडून प्रकर्षानं मांडणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांना दुसरा मोठा धक्का दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत पत्ता कट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षानं जिल्हा प्रभारींच्या यादीतही संधी मिळालेली नाही.
महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या यादीत माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह लोकसभेला पडलेल्या 5 जणांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात सुजय विखे पाटील,राम सातपुते, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, रामदास तडस, प्रीतम मुंडे, भारती पवार या नेत्यांचा समावेश आहे. पण या यादीत भाजपचा हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जाणाऱ्या नवनीत राणा यांच्याकडे कोणत्याही जिल्हा प्रभारीपद दिलेली नाही. त्यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपनं कानाडोळा केला आहे,यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
यापूर्वी भाजपकडून राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार नवनीत राणा यांचा समावेश करण्यात आला नव्हता. राणा यांना उमेदवारी मिळेल,अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र,नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत भाजपनं सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता.
एकीकडे भाजपची राज्यसभेची उमेदवारांची यादी जाहीर होताच नवनीत राणा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.त्या म्हणाल्या,'संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोडसे नई शुरुवात कर सकती हूँ.' नवनीत राणा यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्या काहीशा भावनिक झालेल्या दिसल्या त्यातूनच आपण कुठल्याही वळणावरून नवीन सुरुवात करू शकतो,असंही राणा यांनी व्हिडीओत म्हटलं होतं.
माजी खासदार नवनीत राणा यांना पक्षासोबतच्या गद्दारीचा आरोप भोवल्याची चर्चा आहे. 2017 च्या ज्या निवडणुकीत भाजपनं अमरावतीत 45 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवलं होतं.परंतु यावेळी भाजपला 25 चा आकडा गाठणंसुद्धा कठीण झालं होतं. त्यामुळे पराभूत तसेच काही निवडून आलेल्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून या पराभवासाठी भाजपच्या नेत्या तसेच माजी खासदार नवनीत राणा यांना दोषी ठरवलं होतं.
नवनीत राणा यांच्यामुळेच आमचा पराभव झाल्याचा दावा या उमेदवारांनी पत्राच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे त्यांचे पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अमरावती शहरात चांगलीच खळबळ उडवली होती.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या महाराष्ट्रातील राजकारणात आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून समोर आल्या आहेत. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचं आव्हान, लाउडस्पीकर वाद आणि हिंदुत्ववादी विधानांमुळे त्या सातत्यानं भाजपची आक्रमक भूमिका मांडत असतात. त्यांना 'हिंदू शेरनी' असेही संबोधले जाते. राणा यांच्याकडे भाजपच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जातात. पण त्यांच्याकडेच भाजपनं पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.