

Chandrapur News: विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत मोठा पक्ष ठरुनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिला. या काळात चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात अभूतपूर्व संघर्ष पाहायला मिळाला होता.धानोरकर आणि वडेट्टीवार वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. पण तरीही काही नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत भाजपनं सत्ता खेचून आणली.आता पुन्हा एकदा चंद्रपूर चर्चेत आलं आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून'हिराई महोत्सवा'च्या (राजमाता राणी हिराई जन्मोत्सव) उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच महोत्सवाच्या उद्घाटनात राजशिष्टाचाराचा मुद्दा पेटल्याचं दिसून आलं.काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमात पारा चढल्याचं पाहायला मिळालं.
महापालिकेच्या'हिराई महोत्सवा'त मंगळवारी मोठं नाराजीनाट्य रंगलं.याचदरम्यान,माजी मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे भाषणाला उभे राहताच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्टेजवरून थेट वॉकआऊट केल्याचं समोर दिसून आलं.
काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर महापालिकेच्या हिराई महोत्सवाची निमंत्रण पत्रिका तसेच उद्घाटनप्रसंगी त्यांच्या नावाचा व्यवस्थित उल्लेख न झाल्याचा ठपका ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी त्यांनी प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले.
या कार्यक्रमात माजी मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार भाषणासाठी उभे राहिले असताना खासदार प्रतिभा धानोरकर स्टेजवरून खाली उतरल्या आणि कार्यक्रमातून ताड ताड निघून गेल्या.
महत्त्वाची बाब म्हणजे या राजमाता राणी हिराई जयंती महोत्सवात आदिवासी सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग घेण्यावर प्रशासनाकडून मोठा भर दिला होता.पण आता याच कार्यक्रमात राजकारण तापल्याचं दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.