Congress News : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव खेळला आहे. सपकाळ यांचे कट्टर विरोधक आणि काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विजय अंभोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश लांडे पाटील, गणेशसिंग राजपूत आणि राजेश शेळके यांच्यासह शेकडो कार्यकत्यांचा शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश करवून घेतला आहे. आता अंभोरे यांना सत्तेतून ताकद देत सपकाळ यांची त्यांच्याच होम ग्राऊंडवर शिंदे कोंडी करू शकतात.
विजय अंभोरे हे सपकाळ यांचे कट्टर विरोधक आणि ज्येष्ठ काँग्रेस (Congress) नेते मुकुल वासनिक यांचे कट्टर समर्थक म्हणून सुमारे 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रिय होते. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून ते काँग्रेस जोडले होते गेले होते. मध्यंतरीच्या काळात ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विविध पदांवर कार्यरत होते. पण हर्षवर्धन सपकाळ यांचे नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी अंभोरेंनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता.
नव्या टीममध्ये आपल्याला स्थान मिळणार नसल्यानेच त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याची चर्चा होती. पण अंभोरे आणि हर्षवर्धन सपकाळ (Harshawardhan Sapkal) यांचे कधीच पटले नाही. एकच पक्षात असले तरी दोघांचे गट वेगळे होते. यातच सपकाळ यांची थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लवकरच ते नवीन कार्यकारिणी जाहीर करतील. यात आपल्या स्थान मिळू शकणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
वासनिक दोन वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांनतर ते नागपूरमधील रामटेकमध्ये आले. पण बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा गट आजही कार्यरत आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि वासनिक यांचेही संबंध चांगले आहे. सपकाळ हे आमदार होते. मागील अनेक वर्षांपासून ते संघटनेत कार्यरत आहेत. राहूल गांधी यांनी त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जमिनीवरचा व संघटनेतला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.