MLC Krupal tumane Sarkarnama
विदर्भ

Legislative Council Election 2024 : माजी खासदार तुमाने झाले आमदार !

Rajesh Charpe

Vidharbh News : विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना आता आमदार अशी नवी ओळख मिळाली आहे. शिंदे यांच्या धनुष्यबाणावर पूर्व विदर्भातून निवडूण येणारे ते पहिले आमदार ठरले आहेत. त्यांना विदर्भात खिळखिळी झालेली शिवसेनेची संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे.

शिंदे सेनेचे ते पूर्व विदर्भातील एकमेव खासदार होते.काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी केंद्रीयमंत्री मुकूल वासनिक यांचा त्यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्यामुळे तुमाने अचानक लाईमलाईटमध्ये आले होते.पाच वर्षे ठेवलेल्या जनसंपर्काच्या बळावर ते दुसऱ्यांदाही आरामत निवडूण आले होते.मात्र यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकी महायुतीच्या झालेल्या वाटाघाटीत त्यांना थांबावे लागले.असे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.

तुमाने यांनी रामटेकमधून दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकले होते.शिंदे 40 आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा तुमाने हेसुद्धा त्यांच्यासोबत गेले होते. शिंदे यांच्यावतीने 13 खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी तुमाने यांच्याकडे सोपवली होती. हे बघता पुन्हा तुमाने यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र भाजपला तुमाने नको होते.सर्व्हेचे दाखले देऊन त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

त्यांच्याऐवजी उमरेडमधील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना महायुतीने उमेदवारी दिली. यावेळी तुमाने यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदार व मंत्रीपद देण्याचा शब्द त्यांना दिला होता. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच शिंदे यांनी आपला शब्द पाळला.शिवसेनेने आपल्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन उमेदवार विधान परिषदेवर उभे केले होते.त्यापैकी एका जागा तुमाने यांना देण्यात आली होती.

पूर्व विदर्भात रामटेक विधानसभा मतदारसंघातील आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे (Bhandara) आमदार नरेंद्र भोंडेकर हे सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत.मात्र हे दोन्ही आमदार अपक्ष निवडूण आले आहेत.पूर्व विदर्भातून शिंदे यांच्या धनुष्यबाणावर निवडूण येणारे तुमाने हे पहिले आमदार ठरले. पूर्व विदर्भात शिवसेना खिळखिळी झाली आहे. शिंदे सेना आणि ठाकरे सेनेमुळे दोन गटात शिवसैनिक विभाजित झाले आहेत. हे बघता आता शिवसेनेच्या बांधणीसह तुमाने यांच्यावर मोठी जबाबदारी येणार हे निश्चित झाले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT