Ladki Bahin Yojana : महायुतीचेच सरकार येणार अन् लाडक्या बहिणीला खूश ठेवणार! अजित पवार गटाचा आत्मविश्वास

MVA Vs Mahayuti : लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी खटाखट आठ हजार रुपये मोजून देऊ ही घोषणा कशासाठी केली होती, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे
Prashat Pawar
Prashat PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : विधानसभेची निवडणूक आटोपताच लाडकी बहीण योजना बंदी केली जाईल, कर्ज काढून बहिणीची फसवणूक केली जात आहे या विरोधकांच्या आरोपांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार यांनी उत्तर दिले आहे.

पुढचे सरकार महायुतीचे येणार असल्याने ही योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नसल्याचे सांगून पवारांनी काँग्रेसह महाविकास आघाडी या योजनेमुळे काही सूचेनासे झाले असल्याचे सांगितले.

लाडकी बहीण योजनेला Ladki Bahin Yojna जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो महिला रोज अर्ज भरण्यासाठी येत आहेत. रहिवासी प्रमाणपत्रासह काही जाचक अटीसुद्धा आता काढून टाकण्यात आल्या आहेत. कुठल्याही लाभार्थी महिलेला यासाठी अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारता येणार आहे.

हे बघता आता काँग्रेसचे कार्यकर्ते यासाठी पुढाकार घेत आहेत. महिलांचे अर्ज भरून देत आहे. स्वतःचे बॅनर पोस्टर लावून श्रेय लाटत आहे. कुठलीही चांगली योजना येते तेव्हा काँग्रेस पोट दुखते. त्याला विरोध करायचा, त्यावर टीका करायची ही काँग्रेसची सवयच आहे, अशी टीका प्रशांत पवारांनी केली.

आता कर्ज काढून महिलांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र गरीब व गरजू महिलांना पंधराशे रुपये मिळत असेल, त्यांच्या गरजा भागत असेल त्यात वाईट काय? महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील पाच राज्यांमध्ये ही योजना सुरू आहे. महायुती सरकारने ही योजना महाराष्ट्रात सुरू केली आहे.

पुढचे सरकारही महायुतीचे येणार असल्याने ती बंद करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. महाविकास आघाडीलाच ती बंद करायची असल्याने योजनेवर टीका व आरोप केले जात असल्याचे प्रशांत पवार Prashant Pawar यांनी सांगितले.

Prashat Pawar
BJP Politics : भाजप लोकसभेचं आत्मचिंतन करणार; विधानसभेची रणनीतीही ठरवणार; आता 'या' दिवशी अमित शाह पुण्यात

विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही योजना आणली असे काँग्रेसचे म्हणणे असेल तर लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी Rahul Gandhi यांनी खटाखट आठ हजार रुपये मोजून देऊ ही घोषणा कशासाठी केली होती, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असा खडा सवालही पवारांनी उपस्थित केला.

कोणी कितीही आरोप आणि टीका केली तरी आम्ही महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्षांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेश प्रवक्ता या नात्याने आपणास नागपूर, चंद्रपूर व वर्धा या तीन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे प्रशांत पवार यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Prashat Pawar
Nitesh Rane VS Aaditya Thackeray : ...तर आदित्य ठाकरे जेलमध्ये असते; नितेश राणेंचं वर्मावर बोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com