Sharad Pawar- Anil Patnge-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Hingoli Politic's : हिंगोलीत शरद पवारांना मोठा धक्का; निष्ठावंत अन्‌ वजनदार नेता करणार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Anil Patange will join Ajit Pawar's NCP : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आम्ही कोणतीही नाराजी वैगेरे काही नाही. निष्ठा आणि प्रेम असल्यानंतर नाराजी व्यक्त होणे चुकीचे आहे. पण आम्ही गेली दहा वर्षे विरोधात आहोत.

Vijaykumar Dudhale

Hingoli, 03 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले हिंगोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोलीच्या राजकारणातील वजनदार नेता अशी पतंगे यांची ओळख आहे. येत्या रविवारी (ता. ०८ जून) अजितदादांच्या उपस्थितीत पतंगे आपल्या समर्थकांसह घड्याळ हाती घेणार आहेत.

जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना बळकटीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. हिंगोली, वसमत, कळमनुरी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पतंगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले जात असून त्यांच्या बरोबर सेनगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि तालुकाध्यक्षही अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षात प्रवेश करणार आहेत.

अनिल पतंगे यांनी हिंगोली (Hingoli) जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सदस्य म्हणून काम केले आहे. हिंगोलीच्या ग्रामीण राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) चेहरा म्हणून पतंगे यांची ओळख आहे. पंतगे यांच्यासोबत सेनगावचे नगराध्यक्ष कैलास देशमुख, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि सेनगाव तालुकाध्यक्ष गडदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

हिंगोलीची जबाबदारी अजित पवारांनी आमदार राजू नवघरे यांच्यावर दिली आहे. नवघरे यांच्या माध्यमातून अनिल पतंगे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या रविवारी हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या वेळी सेनगाव येथील मेळाव्यात अनिल पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या वेळी हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ, आमदार राजू नवघरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

आमदार राजू नवघरे यांनी आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची साद घातली. त्यांना नकार देणे आम्हाला अशक्य आहे. अत्यंत धडाडीने ते जिल्ह्यात काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या हाकेला ओ देऊन आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनिल पतंगे यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आम्ही कोणतीही नाराजी वैगेरे काही नाही. निष्ठा आणि प्रेम असल्यानंतर नाराजी व्यक्त होणे चुकीचे आहे. पण आम्ही गेली दहा वर्षे विरोधात आहोत. काम करताना सर्वच कार्यकर्त्यांना मोठा त्रास होत आहे. विकासकामांवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर आम्ही अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेत आहेात, असेही पतंगे यंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT