Naxalite Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Naxalite News : विध्वंसाचा मार्ग सोडून ‘या’ माओवादी जोडप्याने धरली विकासाची वाट !

Atul Mehere

Gadchiroli District Naxalite News : माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया पोलिस दलाने यशस्वी कामगिरी केली आहे. १९ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या माओेवादी पती-पत्नीने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. माओवाद म्हणजे विध्वंस, या जोडप्याने विध्वंसाचा मार्ग सोडून विकासाची वाट धरली आहे. (The couple has abandoned the path of destruction and waited for development)

देवरी दलम कमांडर लच्छू ऊर्फ लच्छन ऊर्फ सुकराम सोमारू कुमेटी (वय ३९) व देवरी दलम सदस्य कमला ऊर्फ गौरी ऊर्फ मेहत्री सामसाय हलामी (वय ३६) असे आत्मसमर्पित पती-पत्नीचे नाव आहे. विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झालेल्या नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत पोलिसांतर्फे नेहमी आवाहन केले जात असते.

या आवाहनाला प्रतिसाद देत माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या सुकराम सोमारू कुमेटी व मेहत्री सामसाय हलामी या दोघांनी २२ सप्टेंबर रोजी माओवाद्यांच्या विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती समक्ष आत्मसमर्पण केले.

माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट व्हावे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले.

सुकराम कुमेटीची लच्छूला लच्छन या नावानेसुद्धा ओळखले जाते. तो १९९९ मध्ये माओवादी संघटनेत भरती झाला होता. अबुझमाडमध्ये प्रशिक्षण घेतले, त्यानंतर स्पेशल झोनल कमिटी मेंबर शेखर ऊर्फ सायण्णाचा काही काळ तो अंगरक्षक होता. केशकाल, कोंडगाव, कोरची, खोब्रामेंढा दलममध्ये लच्छनने काम केले आहे. सध्या देवरी दलममध्ये कमांडर होता. चकमक व जाळपोळीचे एकूण सहा गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. पोलिसांनी एकूण १६ लाख रुपयांचे बक्षीस त्याच्यावर ठेवले होते.

मेहत्री मध्य प्रदेशात प्रशिक्षण घेतलेले आहे. मेहत्री हलामीला कमला, गौरीया या नावांनीही ओळखले जाते. नक्षल चळवळीत असताना तिने सुकरामशी लग्न केले. २००१ मध्ये खोब्रामेंढा दलममध्ये भरती झाली. उत्तर बस्तर व बालाघाटच्या (मध्य प्रदेश) जंगलात तिचे प्रशिक्षण झाले. कोरची, खोब्रामेंढा, चारभट्टी दलम, प्लाटून-ए (गडचिरोली), गोंदिया येथील देवरी दलममध्ये तिने काम केले आहे. मारहाण, पोलिस पार्टीवर फायरिंग, जाळपोळ असे एकूण आठ गुन्हे तिच्यावर नोंद आहेत. मेहत्रीवर तीन लाख रुपयांचे बक्षीस आहे.

दोघांनाही बक्षीस मिळणार..

महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत पदनिहाय जाहीर बक्षीस तीन लाख रुपये व केंद्र शासनाच्या एसआरई योजनेअंतर्गत अडीच लाख रुपये असे एकूण पाच लाख ५० हजार रुपये लच्छूला, तर कमला ऊर्फ गौरी हिला चार लाख ५० हजार रुपये तसेच दोन्ही पती-पत्नीने एकत्रित आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त एक लाख पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT