Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गडचिरोलीतील विविध विकास कामांबाबत माहिती त्यांनी घेतली. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नियोजन बैठक मात्र नागपूरला घेतल्याने या मुद्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र बाह्मणवाडे यांनी फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका केली बरसले आहे. देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालक आहेत की मालक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भातील पोस्ट त्यांनी व्हायरल केली आहे.
मागासलेला व माओवादग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहुतांश वेळी राज्याच्या गृहमंत्रांनी स्वत:कडे ठेवले आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आले. गडचिरोलीचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे फडणवीस नेहमीच सांगत आले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसने गेल्या काळात फडणवीस ‘साहेब परत या, झेपत नसेल तर राजीनामा द्या..’ अशा घोषणा देत आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांबाबत नागपुरात बैठक घेतली. गडचिरोलीसह नागपुरातील वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना फडणवीस यांनी नागपुरात बैठक घेतल्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बाह्मणवाडे संतप्त झाले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बाह्मणवाडे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून फडणवीसांच्या पालकत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पोस्टमध्ये बाह्मणवाडे म्हणाले की, काँग्रेसच्यावतीने वारंवार आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोलीत नियोजन समितीची बैठक घेण्याची मागणी केली. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून फडणवीस यांनी गडचिरोलीत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलेली नाही. उपमुख्यमंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यात नवीन विकासाचे प्रकल्प उभे राहतील, रोजगाराच्या संधी निर्माण होऊन युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना 24 तास वीज
मिळेल, वाघ आणि हत्तींचा धुमाकुळ सुरू आहे. त्यावर तोडगा काढेल असे वाटत होते. आरोग्य व्यवस्था गडचिरोलीत कोलमडली आहे. पालकमंत्री जिल्ह्यात येऊन यासर्व बांबीचा आढावा घेतील व प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याचे बाह्मणवाडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. फडणवीस पालकमंत्री असताना ते नागपुरात बैठक घेत आहेत. ब्राह्मणवाडे यांच्या या पोस्टनंतर गडचिरोलीत भाजप आणि काँग्रेस गडचिरोलीत आमनेसामने येण्याची शक्यता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.