Gadchiroli : वनपरिक्षेत्राधिकारी अडकला ‘एसीबी’ अधिकाऱ्यांच्या जाळ्यात

ACB Action : ट्रक्टर सोडण्यासाठी मागितले दहा लाख; पेरमिली क्षेत्रातील कारवाई
Forest Officer in Gadchiroli.
Forest Officer in Gadchiroli.Sarkarnama
Published on
Updated on

Bribe Case : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीचे प्रकार वाढले आहेत. अनेकदा कार्यवाही होऊनही लाचखोरी थांबायचे नाव घेत नाही. गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ट्रॅक्टर सोडण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आरएफओला 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

वनपरिक्षेत्राधिकाऱ्याविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद आंनद जेनेकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. जेनेकर आलापल्ली वनविभागात येणाऱ्या पेरमिली येथे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Forest Officer in Gadchiroli.
Gadchiroli : धान घोटाळ्यात जिल्हाधिकाऱ्यांची 'या' भातगिरणी मालकांवर कारवाई?

तक्रार करणारा व्यवसायाने कंत्राटदार आहे. गडचिरोलीच्या अनेक ग्रामीण भागात ते रस्ते बांधकाम करतात. तुमरगुंडा ते कासमपल्ली या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले होते. या कामावर असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडले होते. त्यांनतर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी ठेकेदारावर तब्बल 72 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. वाहन सोडविण्यासाठी व आकारलेला दंड कमी करण्यासाठी वनपनपरिक्षेत्राधिकारी जेनेकर यांनी कंत्राटदाराला 10 लाख रुपयांची मागणी केली.

तडजोडीनंतर 5 लाख रुपयांत हे प्रकरण ‘सेटल’ करण्याचा निर्णय झाला. अशात तक्रारकर्त्याने गडचिरोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने याप्रकरणी सापळा रचला. गुरुवारी (ता. 4) रात्रीच्या सुमारास प्रमोद जेनकर याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. जेनेकर यांच्या शासकीय निवासस्थानी झडती घेण्यात आली. घरात 85 हजार रुपयांची रोकड आढळली. लाचखोर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गडचिरोली नक्षलग्रस्त व मागासलेला आहे. या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याच्या घटना अनेकदा समारे आल्या आहेत. मात्र लाचखोरी थांबायचे नाव घेत नाही. ट्रॅक्टर सोडविण्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागणाऱ्यावर कारवाई झाल्यानंतर वनविभागात भूकंप झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली एसीबीच्या पोलिस अधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेददीवार, किशोर जंजारकर, नरेश कस्तूरवार, संदीप घोरमोडे, संदीप उडान यांनी केली. शासकीय कामासाठी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल करावी, असे यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गडचिरोलीतील या प्रकरणाचा तपास आता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Forest Officer in Gadchiroli.
Gadchiroli : माओवाद्यांकडून हिंदूरमध्ये चार वाहनांची जाळपोळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com