Bacchu Kadu News, Gram panchayat election
Bacchu Kadu News, Gram panchayat election Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News : बच्चू कडूंच्या भावाला पाडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी अन् भाजपची हातमिळवणी

सरकारनामा ब्यूरो

Bacchu Kadu News : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू यांना भाजप (BJP) , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) घेरले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना राजकारणात संघर्ष करुन उभा राहिलेला नेता म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली आहे. मात्र, आता कडू यांच्याकडूनही घराणेशाहीला सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. बेलोरा ग्रामपंचयत निवडणुकीत बच्चू कडू यांचे भाऊ भैया कडू यांनी पॅनल उभे केले आहे. ते स्वतः सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत.

बच्चू कडू यांचे बेलोरा हे मूळगाव आहे. याच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे भाऊ रिंगणात उतरले आहे. एकूण १३ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये प्रहारचे ५ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ८ जागांसाठी १७ जण रिंगणात आहे. तर सरपंच पदासाठी भैया कडू आणि त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या पाठिंब्यावर परिवर्तन पॅनलचे दत्ता उर्फ रामेश्वर विधाते उभे आहेत. भैया कडू यांना पराभूत करण्यासाठी गावात काँग्रेसच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना विधाते म्हणाले, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. अनेक वर्षांपासून गावात आमदारांचीच सत्ता आहे. मात्र, बरीचशी काम रखडली आहे, असे त्यांनी सांगितले. तर भैया कडू यांनी सांगितले मी भाऊंचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. गावकऱ्यांनी ही निवडणूक लढण्यास सांगितले त्यामुळे भाऊंच्या परवानगीनंतर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT