Shivsena News: उद्धवसेनेत इनकमिंग सुरू, शिंदे गटात गेलेल्यांची घरवापसी..

Aurangabad News: पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी बळजबरी गाडीत बसवून नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या घोषित केल्याचा आरोप केला.
Shinde Group Join Shivsena News, Aurangabad
Shinde Group Join Shivsena News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political : ग्रामपंचयात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता उद्धवसेने जिल्ह्यात पक्ष प्रवेशांचा धडाका लावला आहे. Shivsena काल मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वैजापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर व पैठणचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आपल्या समर्थक व इतर पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत दाखल झाले. राष्ट्रवादी, भाजपला दणका दिल्यानंतर आता जिल्ह्यात शिंदेसेनेला झटका देण्यात उद्धवसेना यशस्वी झाली आहे.

Shinde Group Join Shivsena News, Aurangabad
Grampanchayt Election : भुमरेंच्या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे गट भिडणार..

राज्यातील सत्तांतरानंतर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील पडेगाव येथील बरेच शिवसैनिक हे शिंदे गटात सामील झाले होते. (Aurangabad) त्या सगळ्यांची आज घरवापसी झाली आहे. (Uddhav Thackeray) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे दानवे, तनवाणी यांनी स्वागत केले.

आता उद्धव ठाकरे हेच आपले नेते असा निर्धार करत शिंदे गटाला धडा शिकवणा असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आज प्रवेश केलेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये पडेगाव, मिटमिटा भागातील शिवसेनेचे उपशहरप्रमुख अंबादास म्हस्के, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, शाखाप्रमुख प्रकाश दुबिले, नवनाथ मुळें, किसन कणसे, किरण पेरकर, गोविंद खांड्रे, ग्रामपंचायत सदस्य माळीवाडा कृष्णा मुळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वइच्छेने पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी बळजबरी गाडीत बसवून नियुक्ती पत्र देऊन नियुक्त्या घोषित केल्याचा आरोप केला. आजपासून पुढे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी कार्य करून तळागाळात संघटना मजबूत करण्याचा शब्द त्यांनी नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com