Bribe News sarkarnama
विदर्भ

Yavatmal Bribery News: बावीस हजारांची लाच घेताना गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Yavatmal - Pandharkawada Panchayat Samiti Case: पांढरकवडा येथील चार सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले.

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal - Pandharkawada News: सिंचन विहिरीचे बांधकामाचे बिल काढण्यासाठी 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकार्‍याला रंगेहाथ अटक करण्यात करण्यात आली. विठ्ठल जाधव (वय 55, रा. पांढरकवडा) असे लाचखोर गटविकास अधिकार्‍याचे नाव आहे. अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील पंचायत समितीत गुरुवारी ही कारवाई केली. या कारवाईने संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकवडा येथील चार सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले. बांधकामाचे बिल काढण्यासाठी जाधव यांनी चार विहिरींच्या बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी 23 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. पण हे प्रकरण थेट अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्याने गटविकास अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यासाठी पांढरकवडा पंचायत समितीत सापळा रचण्यात आला. त्यानंतर 22 हजारांची लाच त्यांच्या दालनात स्वीकारतानाच 'बीडीओ'ला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. (Yavatmal Bribe News)

ही कारवाई अमरावतीचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, केतन मांजरे, वैभव जायले, शैलेश कडू, उपेंद्र थोरात, चित्रलेखा वानखडे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बारबुदे, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT