Nagpur News : ॲड. गुणरत्न सदावर्ते केव्हा काय बोलतील आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं कोणाला अडचणीत आणतील याचा काही नेम नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांनी उघडपणे विरोध केला होता. तेव्हापासून भाजपचे वकील असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. स्वतंत्र मराठवाडाच्या मागणी करून रोष ओढावून घेणाऱ्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आता विदर्भाच्या आंदोलनाशी फारसा संबंध नसताना स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबवनकुळे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून भाजपची अडचण वाढवली आहे.
विशेष म्हणजे सदावर्ते यांनी यापूर्वी स्वतंत्र मराठवाडा राज्याची निर्मिती करावी अशी मागणी करून रोष ओढावून घेतला होता. संभाजी ब्रिगेडने त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते. तसेच त्यांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातही त्यांनी उडी घेतली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांनी केलेल्या नेमणुकीवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजला होता. शेवटी सदावर्ते यांना माघार घ्यावी लागली होती. मराठा आरक्षणाला विरोध करून या विरोधात उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती. आता त्यांनी विदर्भात एन्ट्री केली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदला आले असता त्यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री विदर्भातील आहेत आणि पुसदचे आमदार व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतंत्र विदर्भासाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला.
पुसद तालुका जिल्हा घोषित करावा अशी मागणी अनेक दिवसांपासून आहे. याकडे लक्ष वेधून त्यांनी पुसदने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले. आता मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री तसेच भाजपचे प्रमुख नेते विदर्भातले आहेत. त्यामुळे पुसद तालुक्याला जिल्हा घोषित करण्यास अडचण नाही.
पुसदचे पुष्पावंती नगरी असे नामकरून जिल्हा घोषित करावा असाही सल्ला त्यांनी दिला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आमचा दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला द्यावा, सोयाबीनला साडेसात हजार रुपये भाव द्यावा,अशी मागणी विदर्भातील शेतकऱ्यांच्यावतीने शासनाला करीत असल्याचे ते म्हणाले.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर बोलताना ते म्हणाले, दहशतवादी कारवायांसाठी 'मॅरेज जिहाद' भारतात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. या मॅरेज जिहादची चौकशी करण्याची मागणी ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.