Rahul Gandhi Meet PM Modi: देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड; राहुल गांधी अचानक मोदींच्या भेटीला; महत्त्वाचा निर्णय होणार ?

Rahul Gandhi Latest News : पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक पवित्रा घेतला असून दहशतवाद्यांना कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
PM Modi, Rahul Gandhi
PM Modi, Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग पकडला आहे. एकीकडे मोदी सरकारच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांचा धडाका सुरु असतानाच रोज नवे नवे कठोर निर्णय घेतले जात आहेत. यातच आता दिल्लीतून सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर येत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. कोणत्याही क्षणी युध्दाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत.थोड्याच वेळात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अचानक सोमवारी(ता.5 मे)संध्याकाळी पीएमओ कार्यालयात दाखल झाले आहेत. राहुल गांधींच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र,ही भेट सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात असल्याचे बोलले जात आहे.

PM Modi, Rahul Gandhi
India Vs Pakistan War: आधीच बिथरलेल्या पाकिस्तानला नवा मोठा धक्का; 'हा' जुना बलाढ्य मित्र भारताच्या मदतीला धावून आला

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आक्रमक पवित्रा घेतला असून दहशतवाद्यांना कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS)शी संबंधित दुसऱ्यांदा बैठक घेणार आहे.

त्यानंतर ते राजकीय-आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट कमिटीची बैठक घेण्याविषयीची मोठी अपडेट समोर येत आहे. याचवेळी राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक कारवाईला समर्थन जाहीर केलं आहे.

PM Modi, Rahul Gandhi
Shivsena News: अंबादास दानवेंचे खैरेनंतर ठाकरेंच्या जवळच्या आणखी एका शिलेदाराशी उडाले खटके; माध्यमांसमोरच...

पहलगाम हत्याकांडाच्या दोन दिवसांनंतर झालेल्या बैठकीत, सीसीएसने देशाच्या एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.तसेच गुन्हेगारांना शिक्षा होईल असे आश्वासन दिले होते.याचवेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहलगाम पीडितेच्या नातेवाईकांची कानपूरला येथे जात भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com