India Vs Pakistan War: आधीच बिथरलेल्या पाकिस्तानला नवा मोठा धक्का; 'हा' जुना बलाढ्य मित्र भारताच्या मदतीला धावून आला

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. भारतानं पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानला जबाबदार धरत कठोर पावलं उचलली आहेत. एकीकडे पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करतानाच दुसरीकडे युध्दाच्या दिशेनं लष्करी तयारी सुरू केली आहे.
India Vs Pakistan
India Vs Pakistan sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरुन आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. जागतिक स्तरावर मोठी शक्ती समजल्या जात असलेल्या रशियानं आता भारताला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट फोनवरुन संपर्क साधत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत देशाला संपूर्ण पाठिंबा देणार असल्याची स्पष्ट भूमिका पुतीन यांनी मांडली आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत. भारतानं पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानला जबाबदार धरत कठोर पावलं उचलली आहेत. एकीकडे पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करतानाच दुसरीकडे युध्दाच्या दिशेनं लष्करी तयारी सुरू केली आहे. यातच आता रशियासारखा युध्दसामग्रीनं अत्यंत शक्तिशाली असलेल्या रशियानं आता भारताच्या अतिरेक्यांविरोधातील लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन करत पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. याचवेळी त्यांनी हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या प्रती सद्भावनादेखील व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्यातील दोषींसह त्यांच्या समर्थकांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी न्यायाच्या कक्षेत आणायला हवं,असेही पुतीन यांनी म्हटलं आहे.

India Vs Pakistan
Hindu Deportation Demand : देशातील 8 लाख हिंदूंना बाहेर काढा! ‘या’ देशात संसदेच्या निवडणुकीनंतर हिंदू टार्गेटवर

एकीकडे भारतीय लष्कराने युद्धाचा सराव सुरू केल्यामुळे पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. त्याचवेळी भारताला अमेरिका,फ्रान्स,ब्रिटन,जपान, इस्त्राईल,जर्मनी,इराण आणि सौदी अरब यां देशानंतर आता रशियानेही भारताला दिलेल्या पाठिंब्यानंतर जाहीर केला आहे. यामुळे भारताच्या दहशतावादाविरोधातील लढ्याला आणखी धार चढली आहे.पहलगामनंतर पंतप्रधान मोदींना फोन केलेले पुतिन हे 18 वे जागतिक नेते ठरले आहेत.

India Vs Pakistan
Congress Vs BJP : "काँग्रेसला फोडा..." : बावनकुळेंच्या डोक्यात 'भाजप वाढवायचा' की 'लोकशाही संपवायचा' प्लॅन?

पुतीन नेमकं काय म्हणाले...?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधताना भारतातील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कुणी सामील असतील त्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी भूमिहाही स्पष्ट केली. तसेच दहशतवाद तसेच इतर अनेक गोष्टींवर भारत आणि रशिया एकत्र मिळून काम करतील असा विश्वासही पुतीन यांनी मोदींना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com