Hingoli Case | Harassment Crime Maharashtra Sarkarnama
विदर्भ

Hingoli Case : महाराष्ट्र हादरला! पोलीस कार्यालयातील लिपिकाकडून सतत अनैसर्गिक संबंधांची मागणी, त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवलं

Hingoli Harassment Case : तरूणाच्या आत्महत्ये प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाची नांदेडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुतेसोबत मैत्री झाली होती.

Jagdish Patil

Hingoli News, 20 Apr : राज्यात मागील अनेक दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. या घटनांमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे महिलांसह आता पुरूष देखील सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारण हिंगोलीच्या कळमनुरी येथील एका तरुणाला पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ॉ

या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणाची नांदेडमधील पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुतेसोबत मैत्री झाली होती.

याच मैत्रीतून नंतर अभिषेक सातपुते याने आत्महत्या करणाऱ्या तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्याची मागणी केली. यासाठी तो त्याने तगादा लावला होता. मात्र, अखेर लिपिकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणामुळे आता महिलांप्रमाणे पुरूष देखील आता राज्यात सुरक्षित नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT