Nashik News, 20 Apr : नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या बीपीओत काम करणाऱ्या एका महिलेने तिच्यावर कंपनीतील सहकाऱ्यांनी कसे अत्याचार केले. तिच्याशी कसं असभ्य वर्तन केलं याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
त्यामुळे या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि त्यांनी इतर धर्मांतरण प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर होती हे उघडकीस आलं आहे. तक्रारदार पीडित महिलेने 20 जून 2025 ला टीसीएसच्या नाशिकमधील बीपीओत नोकरी करण्यास सुरुवात केली.
नोकरीवर रूजू झाल्यानंतर शाहरुख कुरेशीसह आणखी एका सहकाऱ्यासोबत तिचं ट्रेनिंग सुरु झालं. ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर रझा मेमन लोन विभागाचा टीम लीड होता. त्याचा ट्रेनिंगशी काहीही संबंध नसतानाही तो सतत ट्रेनिंग रुममध्ये येऊन आपल्याला त्रास द्यायचा असा आरोप महिलेने केला आहे.
तिने सांगितलं की, "रझा मेमन सतत ट्रेनिंग रुममध्ये येऊन विचाराचा की, 'तुझा नवरा जर बाहेर गेलाय तर तू घरात एकटी कशी राहतेस तुला भीती वाटत नाही का? तुला कधी गरज वाटली तर मला बोलव, मी तुझ्या घरी यायला तयार आहे.' शिवाय त्याने या महिलेचं नावं 'प्लेअर' ठेवलं होतं. तो तिला ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर तिला या नावाने बोलवायचा.
हा रझा सतत आपल्याशी अश्लील संभाषण करायचा शिवाय गुढी पाडव्याच्या दिवशी साडी नेसून आल्यानंतर त्याने साडीचा पदर ओढला होता, असे गंभीर आरोप या पीडितेने केले आहेत. तर आसिफ अन्सारी नावाच्या टीम लीडरीही वेगळ्या टीममध्ये होता. पण तो जाणुनबुजून माझ्याजवळ यायचा मला नको तिथे स्पर्श करायचा एकदा त्याने त्याने माझ्या मांडीवर आणि खांद्यावर हात ठेवला होता.
शिवाय एकदा आसिफने अचानक मला पाठीमागून मिठी मारली पण मी त्याला धक्का देऊन तिथून निसटले, अशी धक्कादायक माहिती या महिलेने सांगितली. तर हाच आसिफ अन्सारी तिला "हिंदू धर्मात महिलांवर बलात्कार होतो कारण त्या बुरखा घालत नाहीत, असं म्हणाल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.
तर तौफिक अत्तार टेलिकॉलर शिकवण्याच्या कारणाने जवळ बोलवायचा आणि गालाला त्याच्या गालाने मुद्दाम स्पर्श करायचा. शिवाय त्याने माझ्याशी माझ्या पतीबाबत अश्लील आणि अपमानजनक वक्तव्यं केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
तर शफी शेख नावाच्या आरोपीवर देखील या महिलेने गंभीर आरोप केले आहेत. असे एकूण पाच आरोपीं विरोधात या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.