

Beed crime news : बीडमधील गुन्हेगारी राज्यासह देशात गाजते. पुन्हा एकदा बीड हादरलं आहे. माजी मत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानसभा मतदारसंघ गुन्हेगारीनं हादरलं आहे.
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्या प्राणघातक हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे, संजय जाधव हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या घटनेनं परळी अन् बीडमधील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारांचे धाडस प्रचंड वाढले असून, आता राजकीय नेत्यांवरही भररस्त्यात प्राणघातक हल्ले होऊ लागले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर काल रात्री उशिरा सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला.
संजय जाधव यांच्यावर हल्लेखोरांनी (Crime) कोयत्याने सपासप वार केले. प्राणघातक हल्ला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले संजय जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवर असलेल्या आपल्या शेताकडून घराकडे जात होते. ते गोवर्धन शिवारात आले असता, दबा धरून बसलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर वार केले. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर, असा हल्ला झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच संजय जाधव यांनी गावातील एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या पार्श्वभूमीवर, हा हल्ला त्याच वादातून झाला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. तो व्हायरल व्हिडिओ आणि आता झालेला हा प्राणघातक हल्ला, या दोन्ही गोष्टींची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.