Ramdas Athawale On Babasaheb Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Ramdas Athawale : "...तर बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान बनले असते"; रामदास आठवलेंचा मोठा दावा

Ramdas Athawale On Babasaheb Ambedkar : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या एकदिवसीय मेळाव्यानिमित्त ते जळगावमध्ये आले होते.

Jagdish Patil

Jalgaon News, 08 Apr : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या एकदिवसीय मेळाव्यानिमित्त ते जळगावमध्ये आले होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणखी काही काळ आपल्यात राहिले असते तर ते पंतप्रधान झाले असते, असा मोठा दावा आठवले यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यासह देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. वक्फ सुधारणा विधेयकावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले, "केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहेत.

मात्र विरोधकांकडून सतत मुस्लिमांमध्ये गैरसमज निर्माण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे." शिवाय जम्मू-काश्मिरमधील दहशतवादी हल्ले 99 टक्के कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत तिथे खूप शांतता आहे.

काँग्रेसच्या (Congress) काळातच 370 कलम हटवले असतं तर जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता, असा दावा करतच काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिमांना भडकवत आहेत. मात्र भाजप किंवा एनडीए मुस्लिमांच्या विरोधात नसल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

...तर बाबासाहेब पंतप्रधान बनले असते

दरम्यान, यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले, "सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे आणि हा वाद जास्त वाढवू नये, असं माझं मत आहे. संविधान तयार करण्यात सर्वांचं योगदान होतं.

मात्र पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः बाबासाहेबांना म्हटलं होतं की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात," असं सांगतानाच त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणखी दहा-बारा वर्षे आपल्यात राहिले असते तर ते देशाचे प्रधानमंत्री देखील होऊ शकले असते, असा मोठा दावा केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT