Deenanath Hospital: सोनं अन् अंगावरील कपडे पाहून 'दीनानाथ'मध्ये प्रवेश? माजी आमदाराचा आरोप

Ravindra Dhangekar Allegations Against Deenanath Hospital: राज्याच्या आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई करायची यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Deenanath Mangeshkar Hospital
Deenanath Mangeshkar HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीचा पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार न मिळाल्याने किंवा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला असा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विविध संघटना आणि पक्ष वेगवेगळे आरोप रुग्णालय प्रशासनावर करताना पाहायला मिळत आहेत. अशातच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनावर केले आहेत.

वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. या समितीने तयार केलेला अहवालात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने देखील आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिला आहे.

Deenanath Mangeshkar Hospital
Kedar Jadhav: पुण्याचा पठ्ठ्या क्रिकेटच्या मैदानातून राजकीय आखाड्यात; 'या' पक्षात एन्ट्री

आज दीनानाथ मंगेशकर प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. राधाकिशन समितीचे सगळे सदस्य बैठकीत असणार आहेत. राज्याच्या आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई करायची यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणावरती रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकर म्हणाले, देशासाठी मंगेशकर कुटुंबाच्या मोठे योगदान आहे. मंगेशकर कुटुंब आणि रुग्णालय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रुग्णालयाला सरकारने जागा आणि इतर स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. मात्र रुग्णालयाला घालून दिलेल्या नियम आणि अटी रुग्णालय प्रशासनाकडून पाळल्या जात नसल्याचे समोर आल्या आहेत.

Deenanath Mangeshkar Hospital
Uddhav Thackeray: उद्ध्वस्त झालेला कोकणचा गड ठाकरेंसाठी आता अवघड

या रुग्णालयात सोने आणि रुग्णांच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या आधारावर रुग्णालयात प्रवेश दिला जातो. रुग्णालयाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून पंचतारांकित सुविधा काही लोकांना दिली जाते. अशा सारख्या अनेक घटना या रुग्णालयात घडल्या आहेत. त्याबाबतची माहिती आमच्याकडे आहे. मात्र राज्यकर्ते कायम रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घालत आलेला आहेत अशी टीका धंगेकर यांनी केली.

रुग्णालय प्रशासन महापालिकेच्या मिळकत कर स्वरूपातला 27 कोटींचा मिळकत कर भरण्यास टाळाटाळ करत आहे. त्याचप्रमाणे शासनाने त्यांना केलेल्या 100 कोटीचा दंड देखील त्यांनी थकवला आहे. संचालक मंडळाला ही मस्ती आली असून त्यांना वाटत आहे की आपलं कोणी वाकड करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने त्वरित या प्रकरणाची चौकशी करून दवाखाना ताब्यात घेतला पाहिजे असा धंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com