Imtiyaz jaleel  Sarkarnama
विदर्भ

Imtiyaz Jaleel on Navneet Rana : इम्तियाज जलीलांचे नवनीत राणानं खुलं आव्हान ; ओवेसींनी परवानगी दिली तर..

सरकारनामा ब्यूरो

Buldhana News: संभाजीनगरचे खासदार MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी राणा यांना त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

"नवनीत राणा या धर्माचा राजकारणासाठी वापर करीत आहेत. राजकारण खालच्या पातळीवर होत राहिलं तर हा देश कुठे जाईल याचा देखील विचार करावा .असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मला परवानगी दिली तर नवनीत राणा विरोधात अमरावती लोकसभेतून निवडणूक लढवणार," असे थेट आव्हान इम्तियाज जलिल यांनी दिले.

इम्तियाज जलिल म्हणाले, "आमच्या वाट्याला कुणी जाऊ नये, गेले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. नाशिकमध्ये दहा दिवसात दोन मुलांची भर दिवसा हत्या करण्यात आली. त्या आरोपीला तुम्ही पकडत नसाल तर तुम्ही तुमची वर्दी उतरवली पाहिजे. तुम्ही वर्दीच्या लायक नाही म्हणत नाशिकच्या (Nashik) पोलीस अधीक्षकांचा जलील यांनी निषेध केला.

देशात भाजपला हरवायचं असेल तर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. देशाच्या अनेक राज्यांमध्ये ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मग पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीला आम्हाला का बोलावलं नाही, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी नुकताच उपस्थितीत केला. "आम्हाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पराभूत करण्याचे स्वप्न पुर्ण होवू शकत नाही," असा इशारा देखील त्यांनी दिला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT