Sanjay Raut slams Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंच्या नातवानं शेण खाल्लं ; राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं..

Maharashtra Politics : शिंदे यांचे भाडोत्री सैन्य यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही.
Shambhuraj Desai,Sanjay Raut
Shambhuraj Desai,Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Satara News : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत सध्या पाटणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. ते (शंभूराज देसाई) पालक नव्हे मालकमंत्री झाले आहेत. त्यांच्यात अहंकार वाढतो आहे. त्यांचाही पराभव अटळ आहे," असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांचे सैन्य म्हणजे भाजपचे भाडोत्री सरकार आहे, ते भाजपवरच उलटणार आहे. भाजपचे भाडोत्री सैन्य राज्य कारभार करत आहे. भाडोत्री कोणाचेच नसतात आणि ते बाजारबुणगे आहेत. भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ आल्याने भाजपही हतबल आहे. शिंदे यांचे भाडोत्री सैन्य यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही," असे राऊत म्हणाले.

Shambhuraj Desai,Sanjay Raut
Udayanraje Vs Shivendraraje : दोन राजांच्या वादात आता राऊतांची एन्ट्री ; म्हणाले, "हा तर छत्रपतींच्या .."

महाविकास आघाडी बाबत राऊत म्हणाले, "राज्यात आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत विरोधकांची सत्ता उलटवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. जेथे ज्या पक्षाची निवडून येण्याची क्षमता आहे. तेथे त्या पक्षाचा उमेदवार देण्याची चर्चा आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवणार आहोत. प्रसंगी सत्तापालट करण्यासाठी पाहिजे ते करू. जेथे शिवसेना जिंकली त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना लढेल. त्याचे देवाण घेवाण होऊ शकते,"

Shambhuraj Desai,Sanjay Raut
Rohit Pawar slams Ram Shinde : मंत्र्यांना केवळ फोन करून मंजुरी मिळत नाही ; रोहित पवारांचा शिंदेंना टोला

पालकमंत्री देसाई यांच्यावरही खासदार राऊत यांनी जोरदार टिका केली. ते म्हणाले, "मी म्हणेल तसेच होईल, मी म्हणेल तोच कायदा ही हुकूमशाही साताऱ्यात सुरू आहे. दिल्लीत हुकुमशाही चालली नाही, गल्लीत काय चालणार, त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पालकमंत्री देसाई यांचा निश्चितपणे पराभव होईल. मंत्री देसाई यांनी त्यांच्या आजोबांना लोकनेते उपाधी का देण्यात आली होती, याचा अभ्यास करावा. आपला दोनदा विजय झाला आहे. त्याचवेळी त्यांचा तीन वेळा पराभव झाला आहे. पुन्हा बालक, पालक का मालक अशा अविर्भावात वागणाऱ्या देसाई यांचा पराभव होणार आहे,"

Shambhuraj Desai,Sanjay Raut
Rohit Pawar congratulates CM Shinde : रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचं यासाठी केलं अभिनंदन !

"लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नातवाने शेण खाल्ले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्य आजही आदर्शवत आहे. मुंबईत गेल्यावर आम्ही त्यांचे उदाहरण देतो. मराठी माणसासाठी काँग्रेस पक्षात असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सकारात्मक भूमिका घेतली होती. महाराष्ट्र उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या नावावरून संघर्ष व्हायला नको. त्यांचा सन्मान राखला जावा आणि चर्चेतून मार्ग काढला जावा," असा सल्ला राऊतांनी यावेळी दिला.

दोन्ही जागांवर आम्हीच लढणार

"पाटण आणि कोरेगाव विधानसभेची जागा आम्हीच लढणार आहोत. दोन्ही जागांवर आमचाच दावा आहे. त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जागा वाटपासाठी एकत्र येणार असून काही जागांची अदलाबदल होऊ शकते. मात्र ज्या जागेवर ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत, त्याच जागा लढवण्याबाबत आग्रही आहोत," असे राऊत म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com