Nagpur Crime Sarkarnama
विदर्भ

Nagpur Crime : संतापजनक! हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपुरातच टोळक्याने महिलेला पाया पडायला लावलं अन्...

Law and order issues in Maharashtra : नागपुरात राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा अशा दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

Jagdish Patil

Nagpur News, 20 Dec : नागपुरात राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा अशा दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एक म्हणजे कल्याणमधील एका सोसायटीतील मंत्रालायत काम करणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या एका परप्रांतीय व्यक्तीच्या सांगण्यावरून काही गुंडांनी मराठी कुटुंबियांना जबर मारहाण केली आहे.

तर दुसरीकडे नागपुरात (Nagpur) टोळक्याने एका पेट्रोल पंप मालक महिलेला सर्वांसमोर माफी मागायला लावली आणि व्हिडिओ शूट करत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 तारखेला संध्याकाळी दोघेजण नागपूर येथील एमआयडीसी पोलिस स्टेशन अंतर्गत इलेक्ट्रॉनिक झोन चौकातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना एक कुत्रा भुंकला म्हणून एकाने चप्पल फेकून मारल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता.

त्यानंतर ते दोघे निघून गेले आणि स्थानिक राजेश मिश्रासह अन्य पाच ते सहा जणांना घेऊन परत पंपावर आले. यावेळी राजेश मिश्रा आणि सोबत असलेल्या टोळक्याने शिवीगाळ करत. पेट्रोलपण फोडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पेट्रोल पंप चालक महिलेन माफी मागितली. संतापजनक बाब म्हणजे ही महिला माफी मागतानाचा व्हिडिओ (Video) शूट केला आहे.

जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. त्यामुळे पोलिसांऐवजी (Police) आता टवाळखोरांची भीती नागपूर शहरात वाढली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला मला माफ करा असं त्या लोकांसमोर विनंती करताना दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक केल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी साम टिव्हीला दिली आहे. त्यामुळे एकीकडे राज्याचं अधिवेशन सुरू असताना अशा पद्धतीने एखाद्या महिलेला माफी मागायला लावण्याचा प्रकार घडणं ही लाजिरवाणी बाब आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT