Badlapur Case Big Update : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांबाबत कोर्टाचे राज्य सरकारला महत्त्वाचे आदेश

Akshay Shinde Family Court Directive : अक्षय शिंदेवर बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचाराशिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. तर आता अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबियांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Akshay Shinde
Akshay Shindesarkarnama
Published on
Updated on

Badlapur News : बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. तर या प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा काही महिन्यांपूर्वी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे.

अक्षय शिंदेवर बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचाराशिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे दाखल होते. तर आता अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबियांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना घर आणि रोजगार द्या, असं न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं आहे.

न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हे निर्देश सरकारला दिले आहेत. बदलापुरातील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण राज्यासह देशभरात चर्चेत होतं. या घटनेनंतर बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक दिवसभर अडवली होती.

Akshay Shinde
Kalyan Crime : "मराठी माणसं भिकारी...", म्हणत कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून मराठी रहिवाशांना मारहाण, VIDEO व्हायरल

आरोपीला फाशी देण्याची मागणी करत त्यांनी रेल्वेचा चक्काजाम केला होता. लोकांच्या मनातील आक्रोश पाहून न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दाखल घेतली होती. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई-वडि‍लांनी न्यायालयात धाव घेत, आम्हाला बहिष्कृत जीवन जगावं लागत असल्याची व्यथा मांडली. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी झाली.

त्यावेळी कोर्टाने अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना त्रास का सहन करायला लावताय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय मुलाच्या चुकीची शिक्षा त्याच्या आई-वडिलांना भोगायला लावू नका, असंही कोर्टाने म्हटलं आहे. तर शिंदे कुटुंबाला आता संरक्षणाची गरज नसल्याचं राज्य सरकारच म्हणणं आहे. या प्रकरणानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा अक्षयच्या कुटुंबियांनी केला आहे.

Akshay Shinde
Sunil Tatkare Video : 'जयंतरावांच्या पोटातील पाणी हालत नाही', सुनिल तटकरे असं का म्हणाले?

मात्र, आता धमक्यांच प्रमाण कमी झालं आहे. तर धमक्या मिळत असल्यानेच अक्षय शिंदेच्या कुटुंबाने बदलापूरमधून (Badlapur) कल्यामध्ये वास्तव्याला गेल्याचं खंडपीठाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर खंडपीठाने, त्यांना अशी सुरक्षा द्या की त्या कुटुंबाच्या उपजिवीकेच्या आड येणार नाही, असं राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com