
Kalyan News : कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मराठी माणूस मुंबईत सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण 'मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा' असं म्हणत परप्रांतीयांच्या टोळक्याने एका मराठी कुटुंबियांना मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्यामुळे मुंबईत (Mumbai) मराठी माणसाचेच हाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस नावाची इमारत आहे. या सोयायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाचा एक सरकारी अधिकारी राहतो. त्यांने त्याच्या शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख या मराठी व्यक्तीला गुंड बोलवून मारहाण केली आहे. या मारहाणीत देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतल्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता यांनी घराबाहेर लावलेला धूप वर्षा यांच्या घरात गेल्यामुळे तीन वर्षांच्या बाळाला आणि आईला दम लागत असल्याचं गीता यांना सांगितलं. यावरूनच गीता आणि वर्षा यांच्यात वाद सुरू झाला.
त्यानंतर शेजारी राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी दोघींच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख यांनी मध्यस्ती केल्याचा राग गीता यांचे पती अखिलेश शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही गुंडांना बोलवून या दोघांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान आता या प्रकरणात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईरंनी अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो. गाडीला अंबर दिवा लावून फिरतो. त्याचीसोसायटीत इतकी दहशत की, कोणीही त्याच्याविरोधात बोलत नाही. दोन दिवसात शुक्लाला अटक झाली नाही, तर रस्त्यावर उतरू. शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिसात हजर करू, असा इशारा दिला आहे.
तर याच सोसायटीत राहणाऱ्या विजय कळवीकट्टे यांनी माध्यमांशी बोलताना नेमका काय प्रकार घडला हे सांगितलं. ते म्हणाले, मी माझ्या घरात बसलो होतो. त्यावेळी शुक्ला यांनी अभिजीत देशमुख यांचं घर काही लोकांना दाखवलं त्यानंतर बाहेर मोठा गोंधळ सुरू झाला म्हणून मी काय झालं बघायला बाहेर आलो.
त्यावेळी सात ते आठ लोकांनी अभिजित देशमुख यांना रॉडने मारायला सुरुवात केली. यावेळी मी मध्यस्ती करायला गेलो तर मलाही मारहाण केली. शिवाय यावेळी 'मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा'; असं त्या टोळक्यातील लोक म्हणत होते शिवाय त्यांनी ठार मारण्याची धमकीही दिली, असं कळवीकट्टे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.