Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Yavatmal Sarkarnama
विदर्भ

Video Ladki Bahin Yojana : यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच 'लाडक्या बहिणीं'चा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं भाषण सुरु झाल्यानंतर सभेसाठी आलेल्या काही महिलांनी अचानक उठून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामुळे ऐन मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यानच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

Jagdish Patil

Yavatmal News, 24 August : यवतमाळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महिलांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं स्टेजवर भाषण सुरु असतानाच काही महिलांनी सभेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.

महिलांनी घोषणाबाजी करताच त्यांना हटवण्यासाठी काही महिला पोलिस कर्मचारी पुढे आल्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं आणि गोंधळ घालणाऱ्या महिलांना स्टेजवर घेऊन येण्याच्या सूचना केल्या.

सध्या राज्यभरात महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती आणि प्रचार व प्रसार या क्रायक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. हाच कार्यक्रम आज यवतमाळमध्ये (Yavatmal) आयोजिक करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली.

त्यानंतर शेवटचं भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याचं सुरु झालं. यावेळी सभेसाठी आलेल्या काही महिलांनी अचानक उठून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामुळे ऐन मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यानच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे फॉर्म भरुनही अद्याप आम्हाला पैसे मिळाले नसल्याची तक्रार या महिलांची होती. महिलांचा गोंधळ पाहताच मुख्यमंत्र्यांनी भाषण मध्येच थांबवलं आणि त्यांना स्टेजवर घेऊन या असं सांगितलं. दरम्यान, या भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील, असा शब्द दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT