Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघडीने मोठा विजय मिळवल्याने तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. विशेषतः मुंबईतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षाने प्राथमिक बोलणी करून आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात झालेला उशीर महायुतीसाठी डोकेदुखीचा ठरला होता. त्यामुळेच जागावाटपाची बोलणी सुरु झाली असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 7 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या सात जागांवरील उमेदवार देखील जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट व काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
शरद पवार गटाने राज्यात 100 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे, त्यात मुंबईतील 7 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत मुंबईतील जागांवर शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या फोडाफोडीनंतर राज्यातील चित्र काहीसे बदलले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निववडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सात जागा हव्या आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याचे समजते. मुंबईतील घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील विधानसभेच्या या सात जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडे दिला आहे.
शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारही फायनल केले आहेत. त्यानुसार तयारी देखील या मतदारसंघात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, कुर्ल्यातून माजी आमदार मिलिंद कांबळे, वर्सोव्यातून नरेंद्र वर्मा, जोगेश्वरीमधून अजितराव रावराणे, दहिसरमधून मनीष दुबे, अनुशक्ती नगरमधून सुहेल सुभेदार, मलबार हिल येथून क्लाईड क्रास्टो लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.
मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी, 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. त्यामुळे, उर्वरीत जागा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला सोडल्या जातील. त्यामुळे,या दोन्ही पक्षांना कोणत्या जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.