Jayant Patil : मराठा आरक्षणबाबत आणि सरकार अडचणीत येताच काही वकील..., जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil On Gunratna Sadavarte Maharashtra Bandh : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. मात्र या बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
Gunratna Sadavarte, Jayant Patil
Gunratna Sadavarte, Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 24 August : "सरकार अडचणीत आल्यावर काही विशिष्ट वकील समोर येतायत ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाबाबत देखील हेच वकील कोर्टात गेले होते", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता वकील गुणरत्न सदावर्ते निशाणा साधला.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली होती. मात्र या बंद विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने "कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा", असे निर्देश राज्य सरकारला दिले. यानंतर संविधान आणि कोर्टाचा आदर राखत हा बंद मागे घेण्याचं आवाहन आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

Gunratna Sadavarte, Jayant Patil
Sharad Pawar News : 'मविआ'त जागा वाटपाचं भिजत घोंगडं; पण शरद पवार गटाचं 'मुंबई लक्ष्य','इतक्या' जागांची डिमांड

त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस यांनी पवारांच्या आवाहानाला साथ देत. बंद मागे घेतला मात्र, शनिवारी (ता. 24 ऑगस्ट) राज्यभरात महाविकास आघाडीकडून एक तास निषेध आंदोलन करण्यात आलं. सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी पाटील यांनी बदलापूरमधील (Badlapur) घटनेवरून राज्य सरकार आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील पोलिस झोपलेल्या अवस्थेत आहेत. सरकारचे ऐकल्याशिवाय ते काहीच करत नाहीत. कोणती घटना घडली की, सरकारच्या वतीने कुणाचा फोन येतो का? याची ते वाट पाहत असतात. पण सरकारचे ऐकूनही काही पोलिस अधिकारी निलंबित होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी सरकारचे किती ऐकायचे हे लक्षात ठेवावं."

Gunratna Sadavarte, Jayant Patil
Ashish Shelar : 'पवारसाहेबांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही', 'मविआ'च्या आंदोलनावर भाजप नेत्याचा निशाणा

यावेळी त्यांनी वकील गुणरत्न सदावर्तेंवर (Gunratna Sadavarte) निशाणा साधला, "बदलापूर बंदचा नारा देत महाराष्ट्र एकवटायला लागला होता. पण सरकार अडचणीत आल्यावर काही विशिष्ट वकील समोर येतायत ही वस्तुस्थिती आहे. मराठा आरक्षणाबाबतही हेच वकील कोर्टात गेले होते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com