Elon musk, Jayant Patil
Elon musk, Jayant Patil Sarkarnama
विदर्भ

ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या; पाटलांची थेट एलॉन मस्क यांच्याकडे मागणी

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil News : एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यावर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. एलॉन मस्क यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याबाबत एक पोल घेतला आहे. जो पोल येईल तोच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल एलॉन मस्क यांनी विचारला आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाराष्ट्र आणि  कर्नाटकमधील बेळगाव सीमावादातील ट्विटबद्दल मस्क यांना खुलासा करायला अशी मागणी केली आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून सध्या दोन्हीकडील वातावरण चांगलच तापले आहे. जयंत पाटील आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'कर्नाटकच्या-मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलॉन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?' असे पाटील यांनी म्हटले आहे.

‘महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेतली असली तरी त्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमावादावर कोणतीही तडजोड करणार नाही’. असे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी हे ट्विट आपण केले नसल्याचे सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंच्या ट्विटवरुन विरोधकांनी अधिवेशनामध्ये सरकारला घेरले. विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सीमावादावरुन आक्रमक भूमिका घेत ट्विटवर सवाल विचारला. तेव्हा बोम्मईंच्या नावाने खोटे ट्विट कोणी केले. खोटे ट्विट करण्यामागे कोणता पक्ष आहे ते कळले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.

हे ट्विटस आपण केले नसल्याचे बोम्मईंनी दिल्लीच्या बैठकीत सांगितले याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. दरम्यान, मस्क यांच्या या ट्विटनंतर पाटील यांनी त्यांना टॅग करत ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्याआधी कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकार द्या असे म्हटले आहे. यामुळे पाटील यांचे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT