jayant Patil. Sarkarnama
विदर्भ

Jayant Patil Video : अजितदादांबद्दल जयंत पाटलांना काय खटकलं? स्वभाव बदलल्याचे सांगताना म्हणाले...

jayant Patil on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नागपूरमध्ये मिश्किलपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावाचा उल्लेख करून त्यांच्यावर निशाना साधला.

Rajesh Charpe

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नागपूरमध्ये मिश्किलपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वभावाचा उल्लेख करून त्यांच्यावर निशाना साधला. 'आम्हाला सोडून महायुतीत सहभागी झाल्यानंतर दादांचा स्वभाव बदलला आहे. कन्सल्टंट सांगेल तेवढेच ते बोलतात' अशीही पुष्टी यावेळी त्यांनी जोडली.

अजिददादा यांच्यासोबत आपण अनेक वर्षे काम केले. त्यांचा मूळ स्वभाव चांगला ठावूक आहे. दादा एकदा बोलले की तो अंतिम शब्द असतो. ते आपले शब्द कधी मागे घेत नव्हते. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यांचा मूळ स्वभाव दाखवायला आणि बिनधास्त बोलायला बंदी घालण्यात आली आहे.

'अरोरा नावाचा कन्सल्टटंट त्यांनी नियुक्त केला आहे. तो जे सांगतो तेच ते बोलतात. हे अजितदादा खरे नाही. दादा आणि त्यांचा स्वभाव उभ्या महाराष्ट्राला माहिती असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय सन्मान यात्रे दरम्यान अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेली त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम दादा बरेच काही बोलले.

राजकरणासाठी कोणी कोणाचे घर फोडणे योग्य नाही असे म्हटले होते. आमच्या पठ्ठ्याने एक डाव राखून ठेवला असे सांगून त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता टीका केली होती. हाच संदर्भ घेऊन जयंत पाटील यांनी दादांची समाचार घेतला. पश्चाताप झाल्याचे दादा कुठल्या मूडमध्ये बोलले हे मला माहिती नाही. आत्राम कुटुंबात जो वाद झाला त्यावर त्यांना स्वतः आलेल्या अनुभवावर ते बोलले असावे असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी भाग्यश्री आत्राम यांची भेट घेईल. त्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे. असे असले तरी बाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणूक लढतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यामुळे या विषयाची चर्चा रंगली आहे. काहीही झाले तरी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे. गणपती विसर्जनानंतर या सर्व विषयावर चर्चा होईल. आमचे ठरले की तुम्हाला कळवू असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT