Mahavikas Aghadi on Bawankule: संकेत बावनकुळेच्या कार अपघात प्रकरणावर 'मविआ'तील तिन्ही पक्षांची वेगळी भूमिका!

Bawankule Car Accident Case Update : नागपूर शहरात घडलेल्या या अपघाताच्या घटनेवर आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
MVA
MVASarkarnama
Published on
Updated on

Sanket Bawankule Audi Car Accident : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे भरधाव कारने काही गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. यानंतर आता विरोधकांकडून विशेष करून ठाकरे गटाने भाजप आणि गृहमंत्री फडणवीसांवर टीका करणं सुरू केलं आहे. तर महाविकास आघाडीतील अन्य दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि पवार गटाकडून मात्र याबाबत काहीशी सावध भूमिका घेणे पसंत केल्याचे दिसत आहे.

एकीकडे ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी या घटनेवरून फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नसल्याचे म्हटले आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घटना मला माहीत नसल्याचे सांगून यावर भाष्य करण्यास टाळले आहे. तसेच दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनीही संकेत बावकुळे कार चालवत नव्हता, असं म्हटल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या आहेत.

MVA
Nagpur Accident : नागपूरात भीषण अपघात, चार ते पाच गाड्यांचा चेंदामेंदा, भाजप नेत्याच्या मुलावर आरोप

संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसने (Congress) आक्रमक भूमिका घेतली असती असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी संकेत बावनकुळे हाच कार चालवत होता असा दावा केला आहे. त्यांनी याबाबत ट्विटसुद्धा केले आहे. म्हणजे या घटनेवरून महाविकास आघाडीतून केवळ ठाकरे गटाकडूनच भाजपला लक्ष्य करण्यात आल्याचं दिसत आहे.

याशिवाय या अपघातावर प्रतक्रिया देताना काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी म्हटले की, ही घटना माझ्या विधानसभा मतदारसंघात घडली. सुषमा अंधारे नागपूरमध्ये राहात नाहीत. त्यांच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे.

गाडी ही बावनकुळे यांची होती. संकेत बावनकुळे गाडीत बसला होता. मात्र तो कार चालवत नव्हता. संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसनं सोडल नसतं. कारमध्ये तिघेजण बसले होते. ते जेवण करायला गेले होते असे सांगण्यात येते.

MVA
Rahul Gandhi News : '..तर मला नाही वाटत, भाजप 246च्या जवळपासही पोहचली असती'

तर चालक मद्यप्राशन करून कार चालवता होता का? याचा तपास झाला पाहिजे. केवळ राजकारण्याचा मुलगा आहे म्हणून टार्गेट करणे योग्य नाही. राजकीय कुटुंबातील मुलगा असला की राजकरण होते. मात्र नेत्यांचा पोरगा आहे म्हणून भेदभाव व्हायला नको. याकरिता आपण पोलिसांना विचारणा केली. त्यांनी गाडी जप्त केली आहे.

या घटनेतून सर्वच नेत्यांनी बोध घ्यावा असा सल्लाही विकास ठाकरे यांनी दिला. घटनेचे व्हिडीओ फुटेज पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोणालाही सोडण्यात येऊ नये. असेही ठाकरे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com