Gopaldas Agarwal Join Congress : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) अनेक धक्के बसताना दिसत आहेत. लोकसभेतील निराशाजनक कामगिरी आणि आता जागावाटपाचा तिढा यामुळे अनेकजण भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत.
अशातच आता गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला अखेरचा रामराम केला असून येत्या 13 सप्टेंबरला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. गोपालदास अग्रवाल यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ते गोंदिया विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा तर विधान परिषदेवर दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेसला (Congress) चांगलं बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसं भाजपमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील देखील नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता अग्रवाल यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भाजपला गळती लागल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.