devendra fadnavis sarkarnama
विदर्भ

BJP Politics : एक लाखाच्या टार्गेटने देवेंद्र फडणवीस समर्थकांचे टेन्शन वाढले, नेमकं प्रकरण काय?

BJP Politics devendra fadnavis kailash vijayvargiya: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांना एक लाख मतांच्या फरकाने निवडून आणायचे आहे. भाजपची स्थिती मजबूत आहे, असे आवाहन कैलास विजयवर्गीय यांनी केले.

Rajesh Charpe

BJP Politics : मागील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मताधिक्यात घट झाली आहे. यावेळी महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याने मतविभाजनाची शक्यता तुलनेत कमी आहे.

अशा परिस्थिती भाजपचे नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी फडणवीस यांना एक लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण देण्याचे टार्गेट भाजपच्या कार्यकर्त्याला दिले आहे. हे अवघड आव्हान कार्यकर्ते कसे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजयवर्गीय सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी फडणवीस यांच्यासह पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या. प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. स्थानिक राजकीय परिस्थिती जाणून घेतली.

आगामी निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. नागपूर भाजपचा गड आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही मताधिक्य घटले असले तरी नितीन गडकरी यांना कोणी पराभूत करू शकले नाही. भाजपने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांसाठी लाभाच्या योजना जाहीर केल्या आहेत. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विधानसभेत नागपूरमधून भाजपच्या उमेदवाराला कोणी पराभूत करू शकत नाही. फक्त कार्यकर्त्यांनी या सर्व योजना घरोघरी पोहोचवाव्यात, असे विजयवर्गीय म्हणाले.

नागपूरच्या सर्व जागा जिंकणार

मी बंगाल राज्याचा प्रभारी होतो. तेथे भाजपसाठी विपरित आणि अवघड परिस्थिती होती. अशाही परिस्थिती भाजपला मजबूत स्थितीत आणले. त्या तुलनेत नागपूर काहीच नाही. माझ्या नावातच विजय आहे. त्यामुळे भाजपचे सर्व सहा उमेदवार शहातून निवडूण येणार असल्याचा दावाही त्यांनी बैठकीत कैलास विजयवर्गीय यांनी केला.

एक लाखांच्या मताधिक्क्याचा दावा

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांना एक लाख मतांच्या फरकाने निवडून आणायचे आहे. भाजपची स्थिती मजबूत आहे. शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस हे एक लाख मतांच्या फरकांनी जिंकणार असल्याचा दावाही यावेळी केला.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT