Nagpur News : महाराष्ट्रातील बांगलादेशी रोहिंग्यांना हुडकून काढण्याची मोहीम भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हाती घेतली आहे. अकोला, अमरावतीनंतर ते नागपूरमध्येही दाखल झाले आहेत. त्यांच्या आणि महापालिका आयुक्तांच्या भेटीत तब्बल 633 बांगलादेशी नागरिकांना जन्माच्या दाखल्याचा हिशेब लागलेला नाही.
यावरून नागपूरमध्येही बोगस जन्माचा दाखला देणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीला सोशल मीडियावरून बांगलादेशातून प्रोत्साहन दिल्याची शंका व्यक्त केली जात असताना काही रोहिंगे अवैधपणे शहरात वास्तव्यास असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप (BJP) महायुतीला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याची शंका व्यक्त केली जात होती.
यानंतर सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांना हुडकून काढण्याची मोहीम हाती घेतली. अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी बांगलादेशी नागरिकांना दिलेल्या जन्माचे दाखल्यांची आकडेवारी गोळा करणे सुरू केले. यावरून मोठे राजकारण झाले होते.
काँग्रेसने थेट भाजपला टार्गेट केले होते. राज्यात आणि केंद्रात भाजपचीच सत्ता असताना बांगाला देशी भारतात घुसलेच कसे अशी विचारणा करून गृहमंत्र्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र किरीट सोमय्या यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली आहे. गुरुवारी(ता.17) नागपूरमध्ये येऊन त्यांनी रोहिंग्यांनी जन्माच्या दाखल्यासाठी केलेले अर्ज, वितरित केलेले दाखले याची आकडेवारी घेतली.
नागपूर शहरात एकूण 1234 बांगलादेशी नागरिकांनी अर्ज केल्याचे यातून समोर आले. त्यापैकी 601 नागरिकांना दाखले वितरित करण्यात आले आहे. 4 लोकांचे अर्ज फेटाळून लावले. 601 अर्ज प्रलंबित आहेत. 1234 बांगलादेशी नागरिकांकडे जन्माचे दाखले कसे आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागतूनही सुमारे दोन ते अडीच हजार बांगलादेशी नागरिकांना बोगस दाखल देण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. एका जमावाने मोठी दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ केली होती. या जमावाला बांगालादेशातून प्रोत्साहन दिले असल्याची शक्यता वर्तविली जात होती. सोशलमीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्स बांगलादेशातून व्हायरल झाल्या होत्या. याप्रकरणी सायबर पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.