Ranjit Kasale News: पुणे पोलिसांना सरेंडर करण्याआधी रणजीत कासलेंकडून धनंजय मुंडे पुन्हा 'टार्गेट'; म्हणाले 'ते चुकीच्या पद्धतीनं...'

Ranjeet Kasale On Dhananjay Munde : गेल्या काही दिवसांपासून निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे माजी मंत्री धनंजय मुंडे,संतोष देशमुख खूप प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचं नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत.
Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik Karad
Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले हे माजी मंत्री धनंजय मुंडे,संतोष देशमुख खूप प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचं नाव घेत गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. काही दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली होते. तेच कासले गुरुवारी (ता.17) रात्री पुण्यात दाखल झाले असून लवकरच ते पोलिसांना सरेंडर करणार आहेत. पण त्याआधीच त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले आहेत.

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले (Ranjeet Kasle) यांनी पुण्यात दाखल होताच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.त्यात त्यांनी मुंडेंनी माझ्या अकाऊंटवर 10 लाख ट्रान्सफर केले होते असा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले,ज्या दिवशी मतदान होते.त्यादेवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते.ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते, असं आरोप कासले यांनी केला आहे.यावेळी त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं.

आपण पुणे पोलिसांच्या सतत संपर्कात असून त्यांना शरण जाणार आहे.पण मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबद्दल प्रश्न विचारण्यात आले.माझ्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली.पण अरे एन्काऊंटरचा आदेश कुणी उघडपणे देईल का? एन्काऊंटरच्या ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व चर्चा या बंद दाराआड झाल्या,असा दावाही रणजीत कासले यांनी केला आहे.

Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik Karad
Sanjay Ghatge News: महायुतीकडून धमक्या आल्या; भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार घाटगेंचा मोठा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी कासले यांनी बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाली होती,असा दावा करत बीडसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ते आता पुण्यात दाखल झाले आहेत.

मुंडे चुकीच्या पद्धतीनं निवडून आलेत...

रणजीत कासले यांनी या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंच्या निवडणुकीतील विजयाबाबतही धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले, त्यावेळी माझ्या बँक खात्यात अवघे 416 रुपये होते. पण ईव्हीएम मशीनपासून दूर जायचं. ईव्हीएम मशिनला छेडछाड होईल, ते सहन करायचं. तसेच मी गप्प बसावं,म्हणून मला हे 10 लाख रुपये देण्यात आले होते. परळीला माझी ड्युटी होती. त्याठिकाणी अपुरं मनुष्यबळ होतं. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

Dhananjay Munde, Ranjeet Kasle, Walmik Karad
BJP national president election: मोठी बातमी ! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला 'या' तारखेपासून होणार सुरुवात? 15 राज्यातील प्रदेशाध्यक्षही ठरले

याचवेळी निलंबित पोलिस अधिकारी रणजीत कासले यांनी आपला ज्युनिअर तुकाराम मुंढे करण्यात आल्याचा आरोप केला.ते म्हणाले, माझ्या सात बदल्या झाल्या आहेत. मला ज्युनिअर तुकाराम मुंडे करण्यात आलंय. माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. एडीजी निखिल गुप्ता यांनी मला अवघ्या सहा तासांच्या आत निलंबित केलं. कारवाईचे पत्र यायला 48 तास लागतात. पण सहा तासांत माझी चौकशी केली आणि मला निलंबित केलं, अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com