Sanjay Ghatge News: महायुतीकडून धमक्या आल्या; भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार घाटगेंचा मोठा गौप्यस्फोट

Kolhapur Politics : लोकसभा निवडणुकीवेळी मला राज्यातल्या महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी धमक्या दिल्या. कारखान्यासाठी एमएससी आणि केडीसी बँकेकडून दिलेले कर्ज थांबवण्याची धमकी दिली.
Sanjay Ghatge
Sanjay GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीवेळी मला राज्यातल्या महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी धमक्या दिल्या. कारखान्यासाठी एमएससी आणि केडीसी बँकेकडून दिलेले कर्ज थांबवण्याची धमकी दिली. मात्र, तरी देखील मी छत्रपती घराण्याच्या आदरापोटी शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला, असा गौप्यस्फोट नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय घाटगे (Sanjay Ghatge) त्यांनी पत्रकार परिषदेत केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशांची घोडदौड सुरू आहे. त्याला प्रभावित होऊन मी भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणाकडे कोणत्याही पदाची मागणी केलेली नाही. पद द्या म्हणून मी कोणाच्या दरात जाणारा नेता नाही. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी मी भाजप मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. अशा शब्दात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संजय घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Ghatge
Sharad Pawar and Ajit Pawar : शरद पवार अन् अजित पवार पुन्हा एकत्र येणार ! 10 दिवसांत तिसऱ्यांदा होणार भेट

शक्तिपीठ महामार्गाला माझा विरोधच आहे. हा विरोध मी पक्षप्रवेश करतानाच वरिष्ठांना कळविलेला आहे. मुंबईवरून मी पहाटे कोल्हापूरमध्ये आलो आहे. तब्येत बरी नसल्यामुळे मी आजच्या मोर्चामध्ये सहभागी झालो नाही.मोर्चामध्ये सहभागी झालो नाही याचा अर्थ माझा शक्तीपीठला विरोध मावळला असा होत नाही. असे स्पष्टीकरण संजय घाटगे यांनी दिले.

आमदार असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला मंत्री पदाची ऑफर दिली होती. मात्र मी मंत्री पदाचा त्याग करून मी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची मागणी केली. कागल मतदार संघातील अनेक विकास कामे माझ्या मंत्रिपदाच्या त्यागातून झाली आहे. आज काही लोक मी स्वार्थी असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, माझा त्याग त्यांना माहिती नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

Sanjay Ghatge
BJP national president election: मोठी बातमी ! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला 'या' तारखेपासून होणार सुरुवात? 15 राज्यातील प्रदेशाध्यक्षही ठरले

शिवसेनेमधून निवडणूक लढवत होतो. तेव्हा हेच नेते कोणाकडे जाऊन रांगेने पाकीट घेत होते हे मी पुराव्यानिशी सांगू शकतो, असा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी संजय घाटगे यांना उत्तर देताना केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com