Kishore Gajbhiye Sarkarnama
विदर्भ

Ramtek Lok Sabha Constituency : काँग्रेसला रामटेक मतदारसंघात बंडखोरीचा फटका बसणार?

Kishore Gajbhiye News : उमेदवारी न मिळाल्याने नाराज किशोर गजभिये उमेदवारी दाखल करणार

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 and Congress : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. काही जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत, तर काही जागांसाठी संभाव्य उमेदवाराची नावे समोर येत आहेत.

तर अनेक इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची चिन्ह दिसत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवत आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हेच चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षांना धक्का देण्याचाही प्रत्येक पक्षाकडून प्रय़त्न होताना दिसत आहे. तर काही ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरीचे शस्त्र हाती घेत नाराजी दर्शवली आहे.

याच पार्श्वभूमीर काँग्रेसलाही(Congress) विदर्भात धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने रश्मी बर्वेंना उमेदवारी जाहीर केली आहे. तर येथील काँग्रेस नेते किशोर गजभिये यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी आता रामटेक मतदारसंघात काँगेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, माझ्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे. असं गजभियेंनी बोलून दाखवलं. गजभियेंना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक आणि स्थानिक मतदारही नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत आता किशोर गजभिये मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत, काँग्रेसवर बंडखोरीचं शस्त्र उगारणार आहेत.

किशोर गजभियेंनी सांगितले की, जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रश्मी गजभियेंचा अर्ज रद्द होण्याची चिन्हं आहेत. पक्षाने पहिला ए, बी फॉर्म बर्वेंना द्यावा, तर दुसरा मला द्यावा. म्हणजे बर्वेंचा उमेदवारी अर्ज झाल्यानंतर माझ्या रूपाने काँग्रेसचा अधिकृत उमेदवार रामटेक निवडणुकीच्या रिंगणात राहील. गजभियेंच्या या मागणीवर पक्षाकडून अद्याप कोणतही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

गजभिये यांनी सांगितले आहे की, पक्षाकडून साधारणपणे दोन ए.बी फॉर्म पाठवले जातात. पहिला फॉर्म पक्षाकडून जाहीर झालेल्या उमेदवाराकडे दिला जातो, तर दुसरा पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे असतो आणि तो वेळेवर डमी उमेदवारास दिला जातो. त्यानुसार दुसरा फॉर्म मला द्यावा अशी विनंती मी प्रदेशाध्यक्ष पटोलेंकडे केली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप निर्णय़ आलेला नाही. एवढच नाहीतर आपण काँग्रेस अध्यक्षांकडूनही अर्ज दाखल करण्याची परवानगी घेतली असल्याचे गजभियेंनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT