Loksabha News 2024 : लोकसभा निवडणुकीत भाजपची दयनीय अवस्था झाली आहे. उमेदवारी घोषित करताना त्यांची दमछाक होत आहे. काही ठिकाणी उमेदवार पळवून नेऊन जबरदस्तीने उमेदवारी द्यावी लागल्याने भाजपला घाम फुटला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भ ही काँग्रेसचा बळ राहिला आहे. संकटाच्या वेळीसुद्धा काँग्रेसला साथ दिली आहे. रामटेक सोडली तर काँग्रेसबरोबर भाजपची लढत होत आहे. येथील जनतेने ठरवलं आहे, की कॉंग्रेसलाच जिंकून द्यायचं. पहिल्या टप्प्यातील पाचही लोकसभा आम्ही जिंकू, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. विदर्भात पाचही ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची दयनीय परिस्थिती आहे. उमेदवारी घोषित करताना त्यांची दमछाक झाली आहे. उमेदवार जबरदस्तीने पळवून नेऊन उमेदवारी द्यावी लागली आहे. त्यामुळे भाजपला घाम फुटला आहे. धानोरकर यांच्या उमेदवारीवर वडेट्टीवार म्हणाले, पक्षाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. प्रचारासाठी मला जिथं जाता येईल तिथे मी जाणार आहे.
विकास ठाकरे यांचा फॉर्म भरण्यासाठी मी जाणार आहे, गडचिरोली करून चंद्रपूरला जाईन. विदर्भात काँग्रेसची घाेडदाैड राहील. माझा सर्वच ठिकाणी वाटा असेल, मी जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपची घोडदौड रोखण्याचं काम जनता करणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. या वेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. पारवे यांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, काहींना सत्तेमुळे शहाणपण सूचतं. त्याला आमदार होईपर्यंत हुकूमशाही दिसली नाही. उमेदवारी गळ्यात पडल्यावर काँग्रेसची हुकूमशाही दिसत आहे. घोड्याचा आवाज काढून गदा स्वतःला घोडा समजत होते, अशी सडेतोड टीका त्यांनी पारवे यांच्यावर केली. बंटी भंगडीया यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले, मी लहान पोरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देत नाही.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.