Ravi rana, Devendra fadanvis, navneet rana Sarakaranama
विदर्भ

Ladki Bahin Yojna : फडणवीसांच्या लाडक्या आमदाराचं 'लाडकी बहीण' योजनेवरुन धक्कादायक विधान; म्हणाले, 'तर 1500 रुपये परत घेईन!'

MLA Ravi Rana big Statement On Ladki Bahin Yojna: रवी राणा यांनी या कार्यक्रमात ज्याचं खाल्लं त्यांना जागलं पाहिजे.सरकार देत राहते,पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असेही राणा यांनी यावेळी सांगितले.

Deepak Kulkarni

Amravati News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं मध्य प्रदेशात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू केली. या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.आगामी विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात असून विरोधकांनीही या योजनेची चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून एकीकडे योजनेवरुन सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच काही नेत्यांनी मात्र या योजनेचा फायदा करुन घेण्याचे ठरवले आहे.मात्र, अशातच आता महायुतीतील अपक्ष आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जाणार्या रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरुन वादग्रस्त विधान केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे त्यांच्या वक्त्व्यामुळे कायमच चर्चेत असतात.पण आता त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन धक्कादायक वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे दुप्पट म्हणजे 3 हजार करू असा शब्द दिला.त्यासाठीच तुमचा आशीर्वाद मला हवा असल्याचेही राणा यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीत आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम सोमवारी( ता.12) पार पडला.या कार्यक्रमात महिलांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, याच कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरुन एक धक्कादायक वक्त्व्य केले आहे. त्यांनी जर आगामी निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे विधान रवी राणांनी केलं आहे.त्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

रवी राणा यांनी या कार्यक्रमात ज्याचं खाल्लं त्यांना जागलं पाहिजे.सरकार देत राहते,पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असेही राणा यांनी यावेळी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जर आमचं सरकार महाराष्ट्रात आले तर दुप्पट पैसे महिलांना देऊ असे मोठे वक्तव्य केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आमची सत्ता आली तर महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेऐवजी आम्ही 'महालक्ष्मी' योजना आणणार आहोत.आणि या योजनेत आम्ही महिलांना 1500 नाहीतर 3000 रुपये देऊ असेही पटोले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.यामुळे निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची लाडकी बहीण तर काँग्रेसची महालक्ष्मी योजना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT