JP Nadda Satara Tour : पृथ्वीराजबाबा पुन्हा भाजपच्या टार्गेटवर; अतुल भोसलेंना बळ देण्यासाठी जेपी नड्डा कराडमध्ये येणार

Prithviraj Chavan Vs Atul Bhosale : भाजप नेते अतुल भोसले यांच्या कराड दक्षिण मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.
Devendra Fadnavis- JP Nadda-Atul Bhosle-Prithviraj Chavan
Devendra Fadnavis- JP Nadda-Atul Bhosle-Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 12 August : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा हे येत्या शुक्रवारी (ता. 16 ऑगस्ट) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

भाजप नेते अतुल भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अतुल भोसले यांना ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) हे 16 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नेते अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्या कराड दक्षिण (Karad South) विधानसभा मतदारसंघात जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हे उपस्थित राहून विधानसभा निवडणुकीचे रणशिंंग फुंकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह महायुतीचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ अनपौचारिकरित्या फुटणार आहे.

Devendra Fadnavis- JP Nadda-Atul Bhosle-Prithviraj Chavan
Solapur Congress : सोलापुरात काँग्रेसकडून 62 जणांची विधानसभा लढविण्याची तयारी; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावरही डोळा

लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 10 लोकसभा मतदारसंघापैकी फक्त 4 लोकसभा मतदारसंघात यश मिळाले आहे, त्यामुळे महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातूनच नड्डा यांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाजपचे नेते अतुल भोसले हे पारंपारिक विरोधक आहेत. भोसले यांच्या मतदारसंघात जनसंवाद कार्यक्रम ठेवून भाजपने पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis- JP Nadda-Atul Bhosle-Prithviraj Chavan
Raj Thackeray : राज ठाकरेंचा ताफा विदर्भात अडवला तर जागेवरच चोप देणार; आक्रमक मनसेचा इशारा

कराड दक्षिण मतदारसंघात यापूर्वी अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना तुल्यबळ लढत दिली आहे, त्यामुळे ही जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने भोसले यांना पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com