Laxman Dhomble  Sarkarnama
विदर्भ

Laxman Dhomble News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून लक्ष्मण ढोबळेंवर मोठी जबाबदारी

BJP News : राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती.

Mangesh Mahale

Mangalwedha : मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधी म्हणून सुमारे पंचवीस वर्ष काम करणारे माजी मंत्री, भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळेंना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. ढोबळेंची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक व पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढोबळे यांचे राजकीय पुनर्वसन होऊन त्यांच्यावर पक्ष जबाबदारी सोपवेल, अशी चर्चा होती. प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ढोबळेंच्या निवडीची घोषणा केली. "माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पक्षाने मोठा विश्वास ठेवून प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली, ती मी समर्थपणे पार पाडेन," अशी प्रतिक्रिया ढोबळे यांनी दिली.

साहित्यिक व राजकीय भाषेची जाण असलेले ढोबळे यांना भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. शिवाय मागासवर्गीय मतांची बेरीज जुळण्यासाठी भाजपाला ढोबळे यांच्या प्रवेशामुळे मदत होईल, असे बोलले जाते. त्याचा कितपत फायदा होणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

ढोबळे हे मोहोळ व मंगळवेढ्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले होते.2014 मध्ये केंद्र व राज्यातील झालेल्या सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी भाजपशी जवळीक साधली होती.

मूळचे अक्कलकोटचे असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने राजकारणात एन्ट्री घेतली होती. पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ढोबळे यांच्याऐवजी डॉ. रामचंद्र साळे यांना संधी दिली होती.त्यानंतर ढोंबळेंनी भाजपची वाट धरली होती. आपल्या कणखर वाणीने ढोबळेंनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT